Video : धबधब्यात अडकलेल्या तरुणांना शीख तरुणांनी 'पगडी'चा दोर करुन वाचवलं

Sikh Community
Sikh Communityesakal
Summary

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शीख समुदायाच्या (Sikh Community) काही तरुणांनी एका तरुणाचा जीव वाचवल्याचे दिसतेय. जेव्हा एक तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडत होता, तेव्हा त्याला वाचवण्यासाठी शीख तरुणांनी स्वत: च्या पगड्या वापरल्या अन् आपला जीव धोक्यात घालून त्या तरुणाचा जीव वाचवला. शीख कम्युनिटी ऑफ कॅनडाच्या (Sikh Community of Canada) फेसबुक पेजवर ही माहिती देण्यात आलीय.

दरम्यान, ही घटना कॅनडाच्या व्हँकुवरमध्ये घडलीय. जेव्हा पाच मित्र गोल्डन इअर्स प्रांतीय उद्यानात फिरत होते, तेव्हा त्यांना कोणाचा तरी आवाज ऐकू आला, तेव्हा त्यांना नदीच्या काठावर दोन व्यक्ती दिसले. त्यातील एक व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात धबधब्यात अडकली होती, तर दुसरी व्यक्ती त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याचे प्रयत्न अपुरे पडत होते. हे पाहताच, शीख समुदायातील तरुणांनी त्यांना धबधब्यातून (Waterfall) बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. परंतु, अनेक प्रयत्नांनंतरही यातून त्यांना बाहेर काढता येत नव्हते.

Sikh Community
बांगलादेशात 9 वर्षात हिंदूंची 3700 हून अधिक घरं, मंदिरांची तोडफोड

तद्नंतर या शीख युवकांनी आपापल्या पगड्या काढल्या आणि एकमेकांना पगड्या बांधून एक मजबूत दोर तयार केला. या दोराच्या सहाय्यानं पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आलं आणि त्याचा जीव वाचवला. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे, की पाण्याचा एक जोरदार प्रवाह सुरु आहे आणि त्यात एक व्यक्ती अडकलीय, तर दुसरी व्यक्ती मदतीसाठी विनवण्या करत आहे.

या शीख तरुणांपैकी कुलजिंदरनं सांगितलं, की पाण्याचा जोरदार प्रवाह होता आणि किनाऱ्यावर दोन तरुण अडकले होते. आम्ही त्यांना पाहताच, तिथं पोहोचलो. मात्र, त्यांना वाचवण्यासाठी आमच्याकडं कोणतंच उपकरण नव्हतं. आमच्याकडे त्यांना वाचवण्यासाठी फक्त आमची पगडी होती, म्हणून आम्ही ही युक्ती शोधली. त्या तरुणाला वाचवण्यात आलं असून यानंतर बचाव पथकही तेथं पोहोचलं होतं. दरम्यान, बचाव पथकानं या शीख तरुणांचं कौतुक करताना सांगितलं, की एवढ्या कमी वेळात उत्तम काम केलं, याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन, असं म्हटलंय.

Sikh Community
अमेरिकेत चांगला पगार, बोनस असूनही 43 लाख लोकांनी सोडली नोकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com