खाशोगी यांच्या हत्येचे तुर्कस्थानकडे पुरावे

वृत्तसंस्था
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

अंकारा : सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचे अनेक पुरावे तुर्कस्थानकडे असल्याचा दावा अध्यक्ष रेसिप तैय्यीप एर्देगान यांनी शुक्रवारी केला. या प्रकरणात तुर्कस्थानकडे हत्येसंदर्भात ध्वनिफितीचा पुरावा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खाशोगी यांच्या हत्येच्या चौकशीचा एक भाग म्हणून तुर्कस्थानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाचे मुख्य वकील रविवारी (ता. 28) इंस्तबूलला येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

अंकारा : सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येचे अनेक पुरावे तुर्कस्थानकडे असल्याचा दावा अध्यक्ष रेसिप तैय्यीप एर्देगान यांनी शुक्रवारी केला. या प्रकरणात तुर्कस्थानकडे हत्येसंदर्भात ध्वनिफितीचा पुरावा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

खाशोगी यांच्या हत्येच्या चौकशीचा एक भाग म्हणून तुर्कस्थानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी सौदी अरेबियाचे मुख्य वकील रविवारी (ता. 28) इंस्तबूलला येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

जमाल यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे सौदी अरेबियाने गुरुवारी (ता. 25) मान्य करीत तुर्कस्थानकडून मिळालेल्या माहितीनंतरच त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सौदीने म्हटले आहे. जमाल हे अमेरिकेतील "वॉशिंग्टन पोस्ट' या दैनिकात स्तंभलेखन करीत असत. मूळचे अमेरिकेतील असलेल्या खाशोगी यांच्या हत्येच्या तपासाची माहिती अध्यक्ष डोनाल्ड्र ट्रम्प यांना "सीएआय'चे संचालक गिना हास्पेल यांनी काल दिली. तुर्कस्थानला भेटीनंतर हास्पेल या काल अमेरिकेला परतल्या. या प्रकरणाचा तपास, त्यातील निष्कर्ष व त्यांची तेथे झालेली चर्चा यांबद्दलची माहिती ट्रम्प यांना दिली, असे "व्हाइट हाउस'च्या प्रसिद्धी सचिव साराह सॅंडर्स यांनी सांगितले. 

खाशोगी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना हास्पेल भेटल्या. हत्येबाबतच्या ध्वनिफितीचा पुरावा हा भक्कम असून याप्रकरणी सौदी अरेबियाला जबाबदार ठरविण्यासाठी अमेरिकेला तो पुरेसा ठरू शकतो, असे ध्वनिफितीमधील आवाज ओळखणाऱ्या व्यक्तीने सांगितले असल्याचे वृत्त "वॉशिंग्टन पोस्ट'ने दिले आहे. ही ध्वनिफीत हास्पेल यांनी ऐकल्याचे त्यात म्हटले आहे. यामुळे आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे, अशी प्रतिक्रिया "सीआयए'चे माजी अधिकारी ब्रुस रिडेल यांनी दिली.  या प्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांनी खाशोगीचा मृतदेह सादर करण्याचा आदेश सौदीचे युवराज यांनी द्यायला हवा, यामुळे शवविच्छेदन करणे शक्‍य होईल आणि कुटुंबीयांना खाशोगींवर अंत्यसंस्कार करता येतील, असे मत सिनेटर जॅक रिड यांनी व्यक्त केले. 

सौदी अरेबियाचा हात नाही : रशिया 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सौदी अरेबियाचे राजे सलमान यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत सौदी अरेबियाचा हात नसेल, असा विश्‍वास रशियाने केला. खाशोगी यांच्या हत्येत सौदीचा हात नसल्याचा विश्‍वास रशियाला वाटत आहे का? असा प्रश्‍न पत्रकाराने केल्यानंतर पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी हा प्रश्‍न अनुचित असल्याचे सांगितले. याबाबत सौदीचे राजे, युवराज महम्मद बिन सलमान यांनी अधिकृत विधान केले असून, त्यावर विश्‍वास न ठेवण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turkey claims to have proof of killing of Journalist jamal khashoggi

टॅग्स