

Turkey Climate Summit
esakal
अंताल्या (तुर्कीये), (पीटीआय) ः वैश्विक तापमानवाढीच्या मुद्यावरून जागतिक नेते, विविध देशांची शिष्टमंडळे आणि हवामानविषयक कार्यकर्ते यांच्यातील विचारमंथनाला आजपासून येथे प्रारंभ झाला. सरत्या वर्षामध्ये अवघे जगच नैसर्गिक संकटांना सामोरे गेले आहे.
युरोपातील उष्णतेची लाट तीव्र झाली असून नेपाळलाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचे हे संमेलन पार पडत आहे.