Turkey Earthquake : काश्‍मीरप्रश्नी पाकची तळी उचलणाऱ्या तुर्कीला भारत करणार मदत; PM मोदी म्हणाले… | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turkey Earthquake india pm modi offered help to earthquake affected turkey

Turkey Earthquake : काश्‍मीरप्रश्नी पाकची तळी उचलणाऱ्या तुर्कीला भारत करणार मदत; PM मोदी म्हणाले…

Turkey Earthquake : तुर्कस्तानने काश्मीरच्या मुद्द्यावर भारताला पाठिंबा दिला नाहीये. तसेच भारताविरधात हा देश पाकिस्तानच्या बाजून बोलत असला तरी देखील आज तुर्कस्तान संकटात सापडलेला असताना भारताने या देशाला मदतीचा हात पुढे केला आहे.

आज तुर्कस्तानमध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे बरीच जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे, 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाने तुर्की हादरले आहे. तेथील परिस्थिती अतिशय वाईट आहे.यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीला मदतीचा हात पुढे केला आहे.

भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये मोठी हानी

तुर्कस्तानमध्ये 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे. आतापर्यंत तेथे 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्याची माहिती दिली आहे.

तुर्कस्तान कायम भारताविरोधात

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान हे नेहमीच भारताला विरोध करत आले आहेत. मग तो काश्मीरचा मुद्दा असो किंवा इतर प्रश्न. पण भारत जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर वसुधैव कटुंबकमबद्दल बोलत आला आङे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुर्कस्तान पाकिस्तानच्या पाठीशी आणि भारताच्या विरोधात उभा असतानाही भारताने त्याला मदतीचा हात देऊन आपले धोरण दाखवून दिले आहे.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पीएम मोदींनी ट्विट करून तुर्कस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. पीएम मोदींनी ट्विट केले की, तुर्कीमध्ये भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झाले आहे.

मी पीडितांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. या दु:खाच्या काळात भारत तुर्कस्तानी जनतेच्या पाठीशी उभा आहे आणि आपत्तीच्या या काळात त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

मोदींनी काय घोषणा केलीय..

मोदी म्हणाले, तुर्कीमधील भूकंपग्रस्त नागरिकांना सर्वप्रकारची शक्य ती मदत करण्यास भारत तयार आहे. बंगळुरु येथील इंडिया एनर्जी वीक २०२३मध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. तत्पूर्वी मोदी म्हणाले, आपण सगळ्यांनी तुर्कीचा विध्वंसक भूकंप पाहिला असेल. यामध्ये अनेक लोकांचे जीव गेले आहेत तसेच मोठी वित्तहानी देखील झाली आहे.

तुर्कीच्या जवळच्या देशांमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले असून नुकसानंही झालं आहे. १४० कोटी भारतीयांकडून या भूकंपातील पीडितांप्रती सद्भावना व्यक्त करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra ModiTurkey