Turkey Earthquake : लेकरांच्या किंचाळ्या, पळापळ अन् डोळ्यांदेखत इमारती जमीनदोस्त, Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turkey Earthquake

Turkey Earthquake : लेकरांच्या किंचाळ्या, पळापळ अन् डोळ्यांदेखत इमारती जमीनदोस्त, Video

Turkey Earthquake News : तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नूर्दगीपासून 23 किमी पूर्वेला भूकंपाचे हे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. मात्र, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता 7.5 एवढी सांगीतली आहे. दरम्यान या प्रकाराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

हाती आलेल्या एका व्हिडिओमध्ये एक इमारत अनेक स्थानिक नागरिकांच्या डोळ्यांदेखत जमीनदोस्त होत आहे. तर या व्हिडिओमध्ये लोकं पळापळ करताना दिसत असून लेकराबाळांच्या किंचाळण्याचा आवाज येत आहे. तर लोक आरडाओरड करत पडलेल्या इमारतीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ पाहून आपला थरकाप उडेल.

दरम्यान, भूकंपाचे धक्के सीरियापर्यंत जाणवले असल्याची माहिती आहे. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तुर्कस्तान आणि सीरियामध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता आहे.