

Wreckage of a Falcon-50 private jet found near Ankara after a fatal crash that killed Libya’s army chief and seven others.
esakal
तुर्किये मध्ये एका मोठ्या विमान अपघात झाला आहे. यात लिबियन लष्कर प्रमुख मुहम्मद अली अहमद अल-हद्दाद यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. लिबियाचे पंतप्रधान अब्दुल-हमीद दबेबेह यांनी तुर्कीमध्ये झालेल्या विमान अपघाताची माहिती दिली आहे. खाजगी जेटमध्ये लिबियन लष्कर प्रमुख, इतर चार अधिकारी आणि तीन क्रू सदस्य होते. अपघातानंतर विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. लिबियन अधिकाऱ्यांनी सांगितले की हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला.