
इस्रायलने ब्रिटनच्या दोन महिला खासदारांना देशात प्रवेश करण्यापासून रोखल्यानं खळबळ उडालीय. इतकंच नाही तर दोन्ही महिला खासदारांना ताब्यातही घेण्यात आलं. दोन्ही महिला खासदार या गाझा संघर्षावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने निघालेल्या एका संसदीय प्रतिनिधीमंडळातून गेल्या होत्या. या घटनेनंतर ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी कठोर शब्दात या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय.