इराणचा पुन्हा रॉकेट हल्ला; इराकमधील अमेरिकेन दूतावासावर सोडले रॉकेट

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 जानेवारी 2020

इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा हल्ला इराकची राजधानी बगदाद येथे थेट ग्रीन झोनवरच करण्यात आला आहे. 

बगदाद : इराण आणि अमेरिकेमधील वाद शिगेला पोहोचला असून काल इराणने अमेरिकेच्या इराकमधील दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले होते. अशातच आज (ता. 9) मध्यरात्रीही इराणने इराकमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. हा हल्ला इराकची राजधानी बगदाद येथे थेट ग्रीन झोनवरच करण्यात आला आहे. 

इराण-अमेरिका तणाव भारतासाठी चिंताजनक

इराकी लष्कराने या घटनेला दुजोरा दिला असून बगदाद शहराच्या सर्वात महत्त्वाच्या अशा ग्रीन झोन असलेल्या भागात दोन रॉकेट कोसळली. यातील एक रॉकेट हे अमेरिकन दूतावासाच्या अगदी जवळ म्हणजे 100 मीटर अंतरावर पडले आहे. या रॉकेट हल्ल्यात कोणतीही जिवीत हानी झाली नसल्याची माहिती इराकी सैन्याने दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दोन कत्युशा रॉकेट्स ही बगदादच्या ग्रीन झोनमध्ये पडली. रॉकेट पडल्याने सायरन वाजला. यातील एक कत्युशा हे अमेरिकेच्या दूतावासाजवळ पडल्याने चिंत व्यक्त केली जात होती मात्र, यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही, असे इराकच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. इराण व अमेरिकेच्या वादात इराकची राजधानीही भरडून निघत आहे.

Video : 'अण्वस्त्रे तयार केली तर बघाच!' ट्रम्प इराणवर भडकले

अमेरिकेने इराणी कमांडर कासीन सुलेमानींची हत्या केल्यानंतर काल इराणने आक्रमक होत अमेरिकेच्या इराकमध्ये असलेल्या दोन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात अमेरिकेचे 80 सैनिक ठार झाल्याचा दावा इराण करत आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशा प्रकारजची कोणतीही हानी न झाल्येच त्यांनी स्पष्ट केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two rockets By Iran hit Iraqi capitals Green Zone