ब्रिटनच्या दोघांना मृत्युदंडाची शिक्षा; सर्गेइ लाव्हरोव्ह

जगभरातून रशियावर टीका; युक्रेनसाठी लढल्याचा आरोप
two sentenced to death in Britain Sergey Lavrov Donetsk People's Republic
two sentenced to death in Britain Sergey Lavrov Donetsk People's Republicsakal

मॉस्को : युक्रेनमधील रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या दोन्तेस्क भागात गुन्हा केल्याच्या आरोपावरून ब्रिटनच्या दोन आणि मोरोक्कोच्या एका व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निर्णयावर जगभरातून रशियावर टीका होत आहे. रशियासमर्थक बंडखोरांनी त्यांच्या ताब्यातील भागाला दोन्तेस्क पीपल्स रिपब्लिक असे नाव दिले आहे. या भागात गुन्हा केल्यावरून बंडखोर अमलात आणलेल्या कायद्यानुसार या तीन व्यक्तींना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आल्याची माहिती रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लाव्हरोव्ह यांनी दिली. दोन्तेस्क पीपल्स रिपब्लिकच्या कामकाजात आम्ही हस्तक्षेप करत नसल्याचे सांगत रशियाने या घटनेची जबाबदारीही झटकली आहे.

‘पीटर द ग्रेट’शी तुलना

युक्रेनच्या पूर्व भागात रशियाचे हल्ले सुरु असताना अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी स्वत:ची तुलना १८ व्या शतकातील ‘पीटर द ग्रेट’ या हुकुमशहाबरोबर केली आहे. रशियाची ऐतिहासिक भूमी परत मिळविण्यासाठी हे युद्ध सुरु असल्याचे ते आज म्हणाले. यावरून रशिया विस्तारवादी धोरण राबविणार असल्याचा तर्क तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘हे अशक्य आहे, असे तुम्हाला वाटते का? रशियासारख्या देशाच्या भोवती कुंपण बांधणे, हे अशक्य आहे. आम्हाला असे कुंपण बांधण्याची अजिबात इच्छा नाही,’ असे सांगत पुतीन यांनी त्यांची दिशा स्पष्ट केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com