फिलिपिन्सला गोनी वादळ धडकले; सात जणांचा मृत्यू

Typhoon Goni kills at least 7 as it hits eastern Philippines
Typhoon Goni kills at least 7 as it hits eastern Philippines
Updated on

मनिला - फिलिपिन्सला रविवारी गोनी चक्रीवादळाचा जोरात तडाखा बसला. या वादळाने कॅटॅन्डुआस बेटाला धडक दिली. वादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी पूर येऊन सात जणांचा मृत्यू झाला असून पूर्व फिलिपिन्समधील सुमारे १० लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. 

हवामान खात्याने वादळाचा अंदाज वर्तविल्याने राजधानी मनिला येथील आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद करण्याचे निर्देश दिले होते. गोनी चक्रीवादळाचा आतापर्यंत काही लाख जणांना फटका बसला असून सुमारे १.९ कोटी जणांना अप्रत्यक्षपणे फटका बसण्याचा अंदाज सरकारने वर्तविला आहे. वादळामुळे जोरदार वारे सुटले असून अनेक गावांत वीज यंत्रणा कोलमडून पडली आहे. पहिल्या तडाख्यानंतर वादळाचा जोर कमी झाला असला तरी अजून धोका टळलेला नाही. सरकारने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. मात्र, कोरोना संसर्गामुळे मोठा खर्च झाल्यामुळे निधीची कमतरता असल्याची स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले. हे चक्रीवादळ ल्यूझॉन बेटाकडे सरकत असून याच बेटावर देशाची राजधानी मनिला आहे. फिलिपिन्सला एका वर्षात सरासरी वीस चक्रीवादळांचा सामना करावा लागतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्णांना हलविले
राजधानीत कोविड-१९ चे सुमारे १ हजार रुग्ण असून त्यांना छावणीतील विलगीकरण कक्षातून रुग्णालय, हॉटेल, खासगी रुग्णालय आणि उत्तर बाल्कन प्रांतात पाठवण्यात आले आहे. तसेच मनिलातील आंतरराष्ट्रीय विमानतळ रविवारपासून ते सोमवारपर्यंत २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आदेश दिले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com