

Indian Embassy Releases Emergency Contacts For Citizens Abroad
Esakal
अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इराणनेसुद्धा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्कराच्या तळांवर हल्ले केले आहेत. इराणने सौदी अरेबियातील आरामको रिफायनरीवर ड्रोन हल्ला केल्यानं हवेत धुराचे लोट पसरले आहेत. रिफायनरीत आग भडकली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना युएई सरकारसह भारताच्या आखाती देशांमध्ये असलेल्या दुतावासांकडून भारतीयांना आवश्यक ती मदत केली जात आहे.