UK Student Visa: ३० नोव्हेंबरपासून व्हिसाचे नियम बदलणार; भारतीय विद्यार्थ्यांनी तपासावी बँक खात्यातील रक्कम

UK Student Visa Rules Change From November 30, 2026 : ब्रिटनमध्ये ३० नोव्हेंबरपासून विद्यार्थी व्हिसाचे आर्थिक निकष बदलणार असून भारतीय विद्यार्थ्यांना वाढीव बँक बॅलन्स सलग २८ दिवस ठेवणे बंधनकारक असेल.
Indian students planning to study in the UK must meet revised student visa financial requirements from November 30, 2026, including the mandatory 28-day bank balance rule.

Indian students planning to study in the UK must meet revised student visa financial requirements from November 30, 2026, including the mandatory 28-day bank balance rule.

esakal

Updated on: 

ब्रिटनमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे नियोजन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युनायटेड किंगडममध्ये ३० नोव्हेंबर २०२६ पासून विद्यार्थी व्हिसासाठी आर्थिक पात्रतेचे सुधारित नियम लागू होणार आहेत. या बदलांमुळे विद्यार्थ्यांना राहणीमानाच्या खर्चासाठी पूर्वीपेक्षा अधिक रक्कम उपलब्ध असल्याचे दाखवावे लागणार आहे. आर्थिक निकषांमधील वाढ तीन टक्क्यांपेक्षा कमी असली, तरी जानेवारी २०२७ च्या प्रवेशासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर सलग २८ दिवस बँक खात्यात आवश्यक रक्कम ठेवण्याचे आव्हान असणार आहे.

Loading content, please wait...