युक्रेनमधील घटना; धरण फुटल्याने शेकडो जण विस्थापित, स्फोट करून भिंत पाडल्याचा आरोप

रशियाचा ताबा असलेल्या युक्रेनच्या दक्षिण भागातील एका मोठ्या धरणाची भिंत कोसळून नागरी वस्तीत पाणी शिरले
ukraine accuses russia of blowing up nova kakhovka dam near kherson
ukraine accuses russia of blowing up nova kakhovka dam near khersonsakal

किव्ह : रशियाचा ताबा असलेल्या युक्रेनच्या दक्षिण भागातील एका मोठ्या धरणाची भिंत कोसळून नागरी वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याबरोबरच शेकडो जणांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले आहे. मध्यरात्री झालेल्या एका स्फोटानंतर ही भिंत कोसळल्याचा दावा केला जात असून यावरून युक्रेन आणि रशिया यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.

रशियाने स्फोट करून खेरसन प्रांतातील काखोव्हका जलविद्युत ऊर्जा केंद्र आणि धरणाचे नुकसान केल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. तर, युक्रेनी सैन्याने या भागात हवाई हल्ले केल्यानेच धरणाचे नुकसान झाले, अशी टीका रशियाने केली आहे. या भागावर सध्या रशियाचा ताबा आहे. या मोठ्या धरणाची एक भिंत कोसळल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून अनेक घरे पाण्याने वेढली गेली आहेत.

सुमारे ८० नागरी वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. येथील शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे, तर सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. धरणातील पाणी वेगाने कमी होत असल्याने रशियाचाच ताबा असलेल्या क्रिमिया या प्रांतात पाण्याची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

धरण फुटल्याने रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धालाही वेगळी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला १६ महिने झाले आहेत. रशियाने युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्वेकडील काही भागांवर ताबा मिळविला आहे.

ukraine accuses russia of blowing up nova kakhovka dam near kherson
Shirdi Nilwande Dam: तीन दिवसांच्या आत निळवंडे कालव्याची चाचणी बंद; 'हे' मोठं कारण आलं समोर

मात्र, पाश्‍चिमात्य देशांच्या पाठबळावर युक्रेन एक हजार किलोमीटरच्या युद्धसीमेवर आगेकूच करण्याचा प्रयत्न करत आहे. याचवेळी या भागात धरणाचे पाणी शिरल्याने युक्रेनला अडचण निर्माण होऊ शकते. मात्र, रशियाच्या ताब्यात असलेल्या आणि युक्रेनचे नियंत्रण असलेल्या दोन्ही भागांना पुराचा धोका असल्याने धरण फुटल्याचा कोणाला फायदा होईल, याचा अंदाज बांधणे कठीण जात आहे.

‘रशिया हा दहशतवादी देश’

हेग : ‘रशिया हा दहशतवादी देश असून आमच्यावर हल्ले करत केलेल्या नुकसानीची त्यांनी भरपाई द्यावी,’ अशी मागणी युक्रेनने आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियाचा घेतलेला ताबा आणि फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरु करण्यापूर्वी युक्रेनच्या पूर्व भागातील बंडखोरांना शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी युक्रेनने रशियाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दावा दाखल केला असून त्याची आजपासून सुनावणी सुरु झाली.

ukraine accuses russia of blowing up nova kakhovka dam near kherson
Russia Ukraine Crisis : युक्रेनचा थेट मॉस्कोवर हल्ला; ड्रोन हवेतच नष्ट केल्याचा रशियाचा दावा

रशियासमर्थक बंडखोरांनी २०१४ मध्ये मलेशिया एअरलाइन्सचे विमान पाडल्याने २९८ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यासह रशियाने युक्रेनवर आतापर्यंत केलेल्या विविध हल्ल्यांबद्दल नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. ‘आम्हाला युद्धभूमीवर पराभूत करण्याची रशियामध्ये क्षमता नाही. त्यामुळेच ते नागरी वस्त्यांवर हल्ले करत आहेत. आजच त्यांनी एक धरण फोडून शेकडो जणांचा जीव धोक्यात घातला,’ असा आरोपही युक्रेनने न्यायालयासमोर केला.

धरण फुटल्याचे संभाव्य परिणाम

  • युक्रेनच्या युद्धमोहिमेत अडथळे

  • झॅपोरिझ्झिया येथील अणु प्रकल्पाला पाण्याचा तुटवडा

  • क्रिमियामध्ये पाण्याची समस्या

  • पर्यावरणावर मोठा परिणाम

  • हजारो वन्यप्राणी आणि वृक्ष नष्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com