युक्रेनने केला रशियावर हवाई हल्ला, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच...! | Russia Ukraine Crisis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine Air Strike On Russia

युक्रेनने केला रशियावर हवाई हल्ला, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच...!

माॅस्को : युक्रेन आणि रशिया दरम्यान युद्ध थांबण्याऐवजी आणखीन तीव्र होताना दिसत आहे. युक्रेनने देशात घुसून हवाई हल्ला (Air Strike) केला आहे. त्यात दोन कर्मचारी जखमी झाल्याचा असा आरोप रशियाने केला आहे. युक्रेनने तेल डेपोवर हल्ला केला आहे. काही तज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते, की रशिया (Russia) स्वतः आपल्या देशात हल्ला करण्याचा दिखावा करु शकतो. आणि त्या हल्ल्याचे खापर युक्रेनवर (Ukraine) फोडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. युक्रेनने दोन लष्करी हेलिकाॅप्टरच्या मदतीने हल्ला केला असे, रशियन अधिकारी याकेस्लाव ग्लाडकोव यांनी सांगितले. बेलग्रेड शहरात युक्रेनचे दोन हेलिकाॅप्टर घुसले आणि त्यांनी एस-८ राॅकेट्सच्या मदतीने हल्ला केल्याचे रशियाने आरोप केला आहे. (Ukraine Air Strike On Country, Russia Claims)

जर रशियाचा हा दावा जर खरा असेल तर दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाने रशियावर हवाई हल्ला केला आहे. युक्रेनने ज्या तेल डेपोवर हल्ला केला आहे, त्याचे देखभाल रशियाची सरकारी कंपनी रोजनेफ्ट करते. या हल्ल्यात कंपनीचे दोन कामगार जखमी झाले आहेत. या व्यतिरिक्त अनेक जणांना घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला गेला आहे.

पुतीन स्वतः हल्ला करु शकतात

युक्रेनने अद्यापही रशियाच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रशियाच्या दाव्यावर पाश्चात्त्य देश प्रश्नचिन्ह उपस्थित करित आहेत. गेल्या आठवड्यात रशियन नेत्याने दावा केला होता, की पुतीन सरकार स्वतः रशियाच्या काही शहरांमध्ये हल्ले करु शकतात. यातून ते दाखवतील की युक्रेनने आक्रमकता दाखवत त्यांच्या भागांवर हल्ला केला आहे. मग त्यामुळे युक्रेनवर हल्ला करणे चुकीचे नाही, असे रशिया म्हणू शकतो. इलिया पोनोमारेव यांनी दावा केला होता, की रशिया आपल्याच रासायनिक आणि शस्त्रास्त्र कारखान्यांवर हल्ला करु शकतो. यात नागरिकांचाही मृत्यू होऊ शकतो.