Ukraine War Video |रशियाच्या तावडीतून घेतला रणगाडा.. 'आम्ही करून दाखवलं' म्हणत युक्रेनींची शेतात रणगाडा राईड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रशियाच्या तावडीतून घेतला रणगाडा.. 'आम्ही करून दाखवलं' म्हणत युक्रेनींची शेतात रणगाडा राईड

रशियाच्या तावडीतून घेतला रणगाडा.. 'आम्ही करून दाखवलं' म्हणत युक्रेनींची शेतात रणगाडा राईड

रशियाने युक्रेनवर हल्ला करून आठ दिवस उलटले आहेत. दोन्ही राष्ट्रांमध्ये आज चर्चेची दुसरी फेरी पाडत आहे. मात्र अद्याप रशिया सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. युक्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात हल्ले सुरुच आहेत. नुकतेच युक्रेनमधील एका अणूऊर्जा प्रकल्पात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकल्प सुरक्षित असल्याचं युक्रेन सरकारने सांगितलंय.

दरम्यान, काही ठिकाणी रशियन सैन्याची दैना होत आहे. काही भागात रशियन सैन्याला जोरदार प्रत्युत्तर द्यावं लागलंय. तर काही भागात नागरिक आणि सैनिकांमध्ये बाचाबाची झालीय. सध्या आणखी एक व्हिडीओ समोर आलाय. रशियाच्या ताब्यातील रणगाडा युक्रेनी नागरिकांच्या हाती आल्यानंतर त्यांना बर्फात संचार करण्याचा मोह आवरला नाही. रणगाड्यावर बसून त्यांनी व्हिडीओ शूट केलाय. 'आम्ही करून दाखवलं' अशा भावना त्यांच्या आहेत.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार युक्रेनच्या खार्किवमधील व्यक्तींच्या एका गटाने बर्फाळ शेतात पकडलेल्या रशियन रणगाड्याला चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घोषणा देत रणगाड्यावर व्हिडीओ शूट केला आहे. 'ग्लोरी टू युक्रेन' असं एकजण त्याच्या मातृभाषेत ओरडला. यावेळी घोषणा देणारे लोक T-80BVM आर्म बॅटल या रणगाड्याची राईड घेत होते. 'आम्ही करून दाखवलं' असं काहीजण ओरडत होते.

Web Title: Ukraine Citizen Takes Tank Ride In Farms

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Russia Ukraine Crisis
go to top