भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना

भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना

दिल्ली : रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine Conflict) आज हल्ला केला आहे. त्यानंतर आता युक्रेनमधील परिस्थिती चिघळली असून युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी भारताकडे मध्यस्थीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी भारत सरकारकडे रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्याविषयीची भूमिका घेण्याची विनंती केली आहे. पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी आणि त्यांना हे युद्ध थांबवण्यास सांगाव, असं कळकळीचं आवाहन या युक्रेनच्या राजदुतांनी केलं आहे. (Russian President Vladimir Putin)

भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना
Ukraine-Russia War Live : 'युद्ध थांबवण्यासाठी भारताच्या पाठिंब्याची वाट पाहतोय'

त्यांनी म्हटलंय की, या प्रकरणामध्ये तुमचे पंतप्रधान पुतीन यांच्यासोबत बोलू शकतात. ते आमच्या राष्ट्राध्यक्षांशीही बोलू शकतात. इतिसाहात देखील, भारताने नेहमीच शांतता राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी एक मजबूत आवाज म्हणून आम्ही भारताकडे अपक्षेने पाहत आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. (Narendra Modi)

सध्याच्या या परिस्थितीमध्ये, आम्ही भारताकडे पाठिंब्यासाठीची याचना करत आहोत. पंतप्रधान मोदी हे जगातील एक अत्यंत ताकदवान आणि आदरणीय नेतृत्व आहे.

भारताने युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी; युक्रेन राजदुतांची PM मोदींकडे याचना
शस्त्र वापरता येणाऱ्याने लष्करात यावं; युक्रेनचं आवाहन

मला माहिती नाही की, पुतीन किती जागतिक नेतृत्वांचं ऐकतात मात्र, पंतप्रधान मोदींजीचं स्थान पाहता मी नक्कीच आशावादी आहे ते या प्रकरणी मजबूत आवाज बनतील. पुतीन किमान या प्रकरणी विचार तरी करायला तयार होतील. आम्ही भारताकडे खूपच अपेक्षेने पाहत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com