Ukraine-Maa Kali : युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला 'माँ कालीचा' आक्षेपार्ह फोटो; नेटकरी संतप्त

ukraine defence ministry tweets derogatory picture of hindu godess maa kali angers indians netizens remarks
ukraine defence ministry tweets derogatory picture of hindu godess maa kali angers indians netizens remarks

पाकिस्तानला शस्त्रे पुरवणाऱ्या युक्रेनने आणखी एका कृतीमुळे भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नुकतेच युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एक फोटो ट्विट केला असून त्यामुळे भारतीय विशेषतः हिंदू संतप्त झाले आहेत.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मां कालीचा आक्षेपार्ह फोटो शेअर करण्यात आला आहे. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांकडून याबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यासोबतच नेटकऱ्यांकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ukraine defence ministry tweets derogatory picture of hindu godess maa kali angers indians netizens remarks
Mann Ki Baat : PM मोदींचे राजकीय गुरू 'लक्ष्मणराव इनामदार' कोण आहेत ?

३० एप्रिलला ट्विट केलेला फोटो

@DefenceU या अधिकृत ट्विटर हँडलने ३० एप्रिलला ट्विट केलेला फोटो 'वर्क ऑफ आर्ट' या कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये माँ कालीची प्रतिमा ही हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मनरोच्या पोजमध्ये दाखवण्यात आली आहे. स्फोटातून निघालेल्या धुरात माँ कालीचा चेहरा मर्लिन मनरोसारखा दिसत आहे. त्याची जीभ बाहेर आहे आणि त्याच्या गळ्यात कवटीचा हार दिसत आहे. या फोटोमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

ukraine defence ministry tweets derogatory picture of hindu godess maa kali angers indians netizens remarks
Yuzvendra Chahal : रोहितच्या बर्थ डे पार्टीत युजवेंद्र चहल टल्ली? अडखळत चालतानाचा 'तो' Video Viral

भारतातील संतप्त नेटिझन्सनी हा प्रकार आक्षेपार्ह आणि 'हिंदूफोबिक' असल्याचे म्हटले आहे. या फोटोवर संतापलेल्या नेटकऱ्यांनी भारतातील अनेक संतप्त ट्विटर वापरकर्त्यांनी थेट ट्विटर सीईओ इलॉन मस्क आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना टॅग करण्यास सुरुवात केली आहे. तसेच युजर्सनी या दोघांकडे युक्रेनवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने काही वेळातच हा फोटो आणि ट्विट काढून टाकले. पण तोपर्यंत त्याचा स्क्रीन शॉट व्हायरल झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com