Ukraine Russia Conflict : तेल गोदामावर ड्रोन हल्ला; स्फोटानंतर भडकली आग, रशियाकडून प्रतिहल्ले
Ukraine Drone Strike on Sochi Oil Depot : युक्रेनने रशियाच्या सोचीजवळील तेल साठवणूक केंद्रावर ड्रोन हल्ला केला. या स्फोटामुळे मोठी आग भडकली असून प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू झाली आहे.
मॉस्को : युक्रेनने शनिवारी रात्री रशियाच्या सोचीजवळील तेल साठवणूक केंद्रावर ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यानंतर तेलकेंद्रावर मोठी आग भडकली. त्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले करण्यात आले.