सुमीत अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sumy Students

युक्रेनमध्ये सुमीत अडकलेल्या जवळपास ६०० भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.

सुमीत अडकलेल्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका

सुमी - युक्रेनमधील युद्धग्रस्त सुमी शहरात अडकून पडलेले सर्व भारतीय विद्यार्थी या शहराबाहेर पडले आहेत. ‘ऑपरेशन गंगा’अंतर्गत त्यांना मायदेशी आणण्याची तयारी सुरु असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज जाहीर केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘सुमी शहरातून सर्व भारतीयांना बाहेर काढण्यात यश आले असून ते सर्वजण पोल्टावा शहराकडे जात आहेत. तेथून ते रेल्वेने पश्‍चिम युक्रेनमध्ये जातील. त्यांना आणण्यसाठी विमाने सज्ज केली जात आहेत,’ असे बागची यांनी आज संध्याकाळी सांगितले.

युक्रेनमध्ये सुमीत अडकलेल्या जवळपास ६०० भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, सुमीत अडकलेल्या ६९४ भारतीयांना बसच्या माध्यमातून बाहेर काढलं असून त्यांना पोल्टावाकडे पाठवण्यात आलं आहे. सुमीत ६९४ भारतीय विद्यार्थी अडकले होते. ते सर्व आता पोल्टावाकडे गेले आहेत. याबाबत सुमी विद्यापीठातील एका वैद्यकिय विद्यार्थ्यानेसुद्धा भारतीय बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे.

आम्ही पोल्टावाला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मी प्रार्थना करतो की आम्ही सुऱक्षित ठिकाणी पोहोचू आणि हा त्रास संपून जावा अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. युक्रेनची राजधानी किव्हजवळील इरपिन शहरातून नागरिकांना काढण्यासाठी एका ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून मध्य युक्रेनमधील एक शहर पोल्टावामध्ये हलवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना सुमी आणि किव्हजवळील शहरातून बाहेर काढण्यासाठी एका ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. त्या माध्यमातून युक्रेन शहरातील पोल्टावामध्ये हलवण्यात आलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (ता. ७) रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या प्रमुखांशी संवाद साधत भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. वारंवार विनंती करूनही सुरक्षित मार्ग उपलब्ध होत नसल्याबद्दल भारताने संयुक्त राष्ट्रांमध्येही नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: Ukraine Indian Students Trapped In Sumi Were Rescued Says Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top