Breaking - युक्रेनचं मिलिटरी प्लेन कोसळलं, 18 जण ठार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 September 2020

धावपट्टीवर कोसळल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

क्यिव - युक्रेनचं मिलिटरी प्लेन ए 26 खार्खिव भागात कोसळलं. या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्लेनमध्ये कॅडेटसह इन्स्ट्रक्टर होते अशी माहिती तिथल्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे. धावपट्टीवर कोसळल्यानंतर दुर्घटनाग्रस्त विमानाने पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु होते. या दुर्घटनेतून दोघे बचावल्याची माहिती समजते. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी शुगेव्ह  शहराच्या जवळ ही दुर्घटना घडली.

खार्खिव एअर फोर्स युनिव्हर्सिटीमधले कॅडेट प्रशिक्षणासाठी गेले होते. ते परत येताना धावपट्टीवरच विमान कोसळले. बीएनओ न्यूज एजन्सीने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ukraine Military plane crashes during training flight