
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या ३ वर्षांपासून युद्धजन्य स्थिती आहे. यात आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीच्या चर्चेची दुसरी फेरी सोमवारी पार पडली. याआधी २०२२ मध्ये तुर्कियेची राजधानी इस्तांबुलमध्ये पहिली फेरी झाली होती. रशिया युक्रेन यांच्यातील चर्चेची दुसऱी फेरी नियोजित वेळेच्या दोन तासांनी सुरू झाली आणि एका तासातच संपली. यावेळी दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी कठोर भूमिका घेतली. रशियाने स्पष्ट केलं की शस्त्रसंधी तेव्हाच होईल जेव्हा युक्रेन रशियाचं नियंत्रण असलेल्या जागांवरून त्यांचे सैनिक हटवेल. तर युक्रेनने म्हटलं की, रशियाला युद्धविराम नकोय. शांतता निर्माण करायची असेल तर नव्या निर्बंधांची गरज आहे.