मनात आलं ते केलं; पुतिन यांच्या'लाइफस्टाइल'ची झलक!

Russian leader vladimir putins
Russian leader vladimir putins Sakal

रशियाचं सर्वेसर्वा व्लादिमिर पुतिन Vladimir Putin हे नाव सध्या चर्चेत आहे. जगभरातून येणाऱ्या शांती संदेशाकडे कानाडोळा करुन आपल्या भुमिकेवर ठाम राहत त्यांनी युक्रेन विरुद्ध युद्धाला सुरुवात केली आहे. पुतिन नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण असो असो वा खेळासंबंधीची त्यांची आवड ते नेहमीच प्रकाशझोतात राहिले आहेत. रशियाचा हा बादशहा पारंपारिक संगिताचा द्वेष्टा आहे.

पारंपारिक संगिताची नावड अन् खेळाकडे वळली पावलं

त्याचे वडील हे बायन (bayan) ( रशियन सूरपेटी) प्रेमी होते. त्यामुळेच पुतिन यांना संगिताविषयी तिटकारा निर्माण झाला, असे बोलले जाते. वेळोवेळी पुतिन यांचे क्रीडा प्रेम (Sport Lover) दिसले आहे. यातूनच ते खेळाकडे वळल्याच्या बातम्या रशियन वृतपत्रतातून समोर आल्या आहेत.

जुडो कराटेची सुरुवात

वयाच्या 11 व्या वर्षी पुतिन यांनी जुडो कराटे खेळायला सुरुवा केली. या खेळाबद्दल त्यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती होती. पण पुतिन यांचे बालपणीचे कोच यांनी घरी जाऊन कुटुंबियांना समजावले. ज्यावेळी त्यांनी क्लासेस सुरु केले त्यावेळी त्यांच्यात लढण्याची क्षमता आहे, असे वाटत नव्हते. पण जसा जसा वेळ पुढे सरकत गेला तशी त्यांच्यातील क्षमता दिसू लागली. शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची जिद्द त्यांच्यात दिसून आल्याचे त्याच्या कोचनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

जुडो चॅम्पियनशिप विनर पुतिन

वयाच्या 21 व्या वर्षी पुतिन यांनी रशियातील सर्वात मोठ्या शहरापैकी एक असलेल्या लेनिनग्रादमधील (सध्याचे नाव सेंट पीटर्सबग) जूडो चँपियनचा मान मिळवत मास्टर रँक मिळवली होती. 1999 मध्ये व्लादिमीर पुतिनसोबत जुडो शिका (Learning Judo with Vladimir Putin ) हे पुस्तकही प्रकाशित झाले होते.

स्कीइंग क्रीडा प्रकारातही नैपुण्य

साहसी खेळापैकी एक असलेल्या स्कीइंग क्रीडा प्रकारातही त्यांना विशेष रुची आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष असतानाही ते स्कीइंगचा आनंद घेतानाचे फोटो अनेकदा समोर आले आहेत. एखादी गोष्ट मनात आली की ती करायचीच ही त्यांची वृती या खेळातही दिसून येते. (आता जे त्यांच्या मनात आहे ती काही चांगली गोष्ट नाही) स्कीइंगमध्ये प्रशिक्षण घेऊन ते बर्फाळ टेकड्यात न जाता तसेच घुसले. त्यामुळे सुरवातीला ते त्याच त्याच चूका करत होते. मात्र दोन वर्षानंतर यातही त्यांनी मास्टर असल्याचे दाखवून दिले. सध्या ते ज्या वेगाने स्कीइंगचं स्किल दाखवतात ते भन्नाटच आहे.

ज्या खेळात माहिर व्हायला वर्षे जातात तो खेळ महिन्यात शिकला

स्केट हॉकीमध्येही पुतिन यांनी आपले स्कील दाखवून दिले आहे. 2011 मध्ये तुर्कीतील एका स्पर्धेदरम्यान पुतिन यांनी युवा ब्रिगेडला हॉकी शिकेन, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी स्केट हॉकीच्या मैदानातही उतरुन दाखवले. 12 वर्षांच्या एका मुलाचा दाखला देत त्याने जी गोष्ट 9 वर्षांत केली ती मी दोन महिन्यात केली, असा किस्साही पुतिन यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितला होता.

रेसिंग प्रेमी पतिन

2006 मध्ये पुतिन यांनी ज्यनिअर जॉर्ज बुशसह 1956 विंटेजच्या सोवियत क्लासिक GAZ-21 तून सवारी केली होती. 2010 मध्ये पुतिन यांनी Lada Kalina तून खाबरोव्स्क ते चिता या पूर्व रशियाच्या भागात 2,000 किमी लॉन्ग ड्राइव्हची अनुभूतीही घेतली आहे. यातून त्यांनी रेसिंगची आवड दाखवू दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com