ब्रिटनचा युक्रेनला पाठींबा; म्हणाले, शस्त्र तसेच संरक्षणात्मक मदत देऊ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

boris johnson

ब्रिटनचा युक्रेनला पाठींबा; म्हणाले, शस्त्र तसेच संरक्षणात्मक मदत देऊ

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधला तणाव आता वाढला असून युद्ध अटळ असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या दोन्ही देशांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच देशांना काही एक ठोस भूमिका घेणं क्रमप्राप्त ठरत आहे. त्यानुसार आता ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही ब्रिटनची अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. 'द स्पेक्टॅटर इंडेक्स'ने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटन युक्रेनला मदत करेल, असं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्ध झाल्यास भारतावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

ब्रिटन युक्रेनला 'प्राणघातक शस्त्रांची तसेच संरक्षणात्मक मदत' देईल, असं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. याबाबतची माहिती 'द स्पेक्टॅटर इंडेक्स'ने दिली आहे.

युक्रेनमधील लुहान्स्क आणि दोनेत्स्क या दोन प्रदेशांचे स्वातंत्र्य मान्य करण्याच्या रशियाच्या निर्णयावर अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांनी आज जोरदार टीका केली. युक्रेनच्या सार्वभौमत्वावर आणि प्रादेशिक एकात्मतेवर हा हल्ला असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. रशियाकडून हल्ला होण्याबाबत अमेरिकेने वारंवार इशारा दिला होता. रशियाची ताजी कृती म्हणजे युक्रेनवर हल्ल्याची पूर्व तयारी असल्याचे मानले जात आहे. युक्रेनचे तुकडे करणारा रशियाचा निर्णय हा २०१४ मध्ये केलेल्या मिन्स्क शांतता कराराचा भंग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. ब्लिंकन म्हणाले की,‘‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर न करण्याची अध्यक्ष पुतीन यांची वृत्ती या घटनेतून स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करत आहोत. लोकशाहीचे पालन करण्याच्या रशियाच्या संसदेच्या दाव्याच्या विरोधात ही कृती असून यामुळे युक्रेनच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर उघड हल्ला आहे.’’

हेही वाचा: भारतीय प्रवाशांसाठी दुबईचा महत्वाचा निर्णय; पूर्व RT-PCR कोविड चाचणी रद्द

इतर देशांच्या प्रतिक्रिया

  • - दक्षिण कोरिया : युक्रेनच्या सार्वभौमत्त्वाचा आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर ठेवायलाच हवा. लष्करी ताकदीच्या जोरावर अनावश्‍यक संघर्ष केल्यास त्याचे जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील.

  • - जपान : पुतीन यांची कृती कदापी मान्य होणार नाही. त्यांच्या निर्णयाला आमचा विरोध आहे.

  • - न्यूझीलंड : बंडखोरांना स्वातंत्र्य देण्याच्या कृतीला आंतरराष्ट्रीय कायद्याचे पाठबळ नाही.

  • - ऑस्ट्रेलिया : रशियाने विनाअट सैन्य माघारी घेऊन शेजारी देशांना धमकाविणे थांबवावे.

  • - चीन : सर्वांनी आक्रमकपणा टाळून राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा.

  • - युरोपीय महासंघ : ही युद्धाची सुरुवातच आहे. आम्ही रशियावर लवकरच निर्बंध लागू करू.

Web Title: Ukraine Russia Crisis Uk Will Give Ukraine Lethal But Defensive Assistance According To Pm Boris Johnson

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..