'रशिया उद्या युक्रेनवर हल्ला करणार'; सीमेवर 1 लाख 30 हजार सैनिक तैनात

Ukraine vs Russia
Ukraine vs Russiaesakal
Updated on
Summary

युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय.

युक्रेनवरून (Ukraine vs Russia) अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय. युक्रेनच्या सीमेवर तब्बल 1 लाख 30 हजार सैनिकांच्या तैनातीनंतर युक्रेननं आपली भूमिका जाहीर केलीय. रशिया आपल्या देशावर लवकरच हल्ला करण्याच्या तयारीत असून हल्ल्याची तारीख 16 फेब्रुवारी दिलीय. मात्र, हा आरोप रशियानं पूर्णपणे फेटाळून लावलाय. दरम्यान, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं बेलारूसमधील आपल्या नागरिकांना परत येण्यास सांगितल्यामुळं युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट होत आहे.

रशिया उद्या युक्रेनवर हल्ला करणार

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zelensky) यांनी सांगितलं की, रशिया 16 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करणार असल्याचं समजतंय. यासाठी आम्ही 16 फेब्रुवारी रोजी 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करणार आहोत. देशातील नागरिकांना राष्ट्रगीत वाजविणे, देशभरात ध्वज फडकणं व निळ्या-पिवळ्या फिती घालण्याचं आवाहन केलंय.

Ukraine vs Russia
कॅनडात आणीबाणी जाहीर; PM Justin Trudeau यांनी घेतला मोठा निर्णय

राष्ट्रीय एकता दिवस साजरा करणार : झेलेन्स्की

सोमवारी सायंकाळी युक्रेनियन नागरिकांना संबोधित करताना झेलेन्स्की म्हणाले, 16 फेब्रुवारी हा आमच्यासाठी एकतेचा दिवस असेल. या दिवशी आम्ही आमचा राष्ट्रध्वज फडकवणार असून निळ्या-पिवळ्या फिती लावून जगाला आमची एकता दाखवून देणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com