Ukraine Russia: युक्रेनी हॅकर्संकडून सायबर हल्ला; युरोपला फटका

हजारो यूजर इंटरनेट सेवेपासून वंचित; युद्धग्रस्त युक्रेनमधील हॅकर्सचा हात
Use of Moneymools for cyber attacks
Use of Moneymools for cyber attacksSakal

बोस्टन : रशियाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देणाऱ्या युक्रेनी सैन्याला त्यांच्याच सायबर आर्मीचे बळ मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युक्रेनमधील हॅकर्संकडून झालेल्या सायबर हल्ल्याचा मोठा फटका युरोपला बसला असून यामुळे हजारो इंटरनेट यूजर्स अचानक ऑफलाइन गेले होते. या हल्ल्यामुळे युरोपमध्ये सर्वांत मोठे इंटरनेट युगातील सायबर युद्ध पेटले आहे. माहितीच्या प्रसाराबरोबरच क्राउड सोर्स इंटेलिजन्सच्यादृष्टीने देखील याला खूप महत्त्व असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

२४ फेब्रुवारी रोजी झालेल्या युक्रेनवर हल्ल्यानंतर फ्रान्समधील ‘नॉर्डनेट’ या कंपनीचे जवळपास ९ हजार सबस्क्राईबर्स अचानक ऑफलाइन गेले होते. अमेरिकी उपग्रह कंपनी ‘व्हायासॅट’ची नॉर्डनेट ही उपकंपनी आहे. ‘बिगब्लू’ या सॅटेलाईट इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या कंपनीने देखील ‘व्हायासॅट’ला मोठा फटका बसल्याने आम्हाला देखील याची झळ सोसावी लागली असल्याचे म्हटले आहे. या कंपनीचे युरोपात ४० हजारांपेक्षाही अधिक सब्स्क्राईबर आहेत. जर्मनी, फ्रान्स, हंगेरी, ग्रीस, इटली आणि पोलंडमधील यूजरना या सायबर हल्ल्याची झळ सोसावी लागली. युरोपातील इंटरनेट नेटवर्क ठप्प झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. युरोपमधील इंटरनेट सेवेचा डोलारा हा ‘केए-सॅट सॅटेलाईट’वर अवलंबून आहे.

Use of Moneymools for cyber attacks
Russia Ukraine: मंगळवेढ्याचे पाच जण सुखरूप मायदेशी

पवनचक्क्या थांबल्या

इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने जर्मनी आणि मध्य युरोपातील जवळपास सहा हजार पवन चक्क्यांची पाती अचानक थांबली, या पवनचक्क्यांतून ११ गिगावॅट एवढ्या विजेची निर्मिती होते. जर्मनीतील ‘एनरकॉन’ या कंपनीने काही भागांतील वीज निर्मिती ठप्प झाल्याचा दावा केला. रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ही समस्या निर्माण झाली होती.

रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबला नाही तर या सायबर हल्ल्याची तीव्रता आणखी वाढू शकते, अशी भीती लष्कर आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली. वेळीच सावधगिरी बाळगल्याने एक मोठा हल्ला टळला आहे. युक्रेनमधील सायबर हल्ल्यात डेटा डिस्ट्रॉईंग व्हायरसचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले. या व्हायरसचे नेमके परिणाम अद्याप स्पष्ट व्हायचे आहेत. रशियाने विविध संस्थांच्या संकेतस्थळांच्या संरक्षणासाठी परदेशातील त्यांच्या अॅक्सेसला चाप लावला आहे.

टर्मिनल निष्क्रीय

‘व्हायासॅट’ने पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेचा हवाला देतानाच या हल्ल्याचा सविस्तर तपशील द्यायला नकार दिला आहे. फ्रान्सच्या स्पेस कमांडचे प्रमुख मायकेल फ्राईडलिंग यांनीही या सायबर हल्ल्याला दुजोरा दिला आहे. युरोप आणि युक्रेनला कवेत घेऊ शकेल एवढा आमच्या उपग्रह नेटवर्कचा आवाका आहे. सायबर हल्ल्यानंतर आमचे हजारो टर्मिनल अचानक निष्क्रीय झाले. याचा मोठा फटका नागरी नेटवर्कला बसल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com