युक्रेनमधुम ५०० भारतीय विद्यार्थी परतले; सिलेक्ट युअर युनिव्हर्सिटीचा दावा

रशिया आणि युक्रेनच्या सीमेवरील ताणतणाव वाढत असून, तेथील मराठी विद्यार्थ्यांना राज्याकडे परतण्याची ओढ लागली आहे.
Ukraine
UkraineSakal

पुणे : रशिया आणि युक्रेनच्या सीमेवरील ताणतणाव वाढत असून, तेथील मराठी विद्यार्थ्यांना राज्याकडे परतण्याची ओढ लागली आहे. विद्यार्थ्यांना परत मायदेशात आण्यासाठी राज्यसरकारने केंद्रसरकारला पत्र लिहिले आहे. मात्र याच दरम्यान सिलेक्ट युअर युनिव्हर्सिटी या शैक्षणिक सल्लागार कंपनीने देशातील ५०० हून अधिक विद्यार्थी परत आणल्याचा दावा केला आहे. यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. (Ukraine Russia)

युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती असली तरी शहरांमध्ये जनजीवन सर्वसामान्य आहे. त्यामुळे नेहमीच्या विमानसेवेबरोबर २२,२३ आणि २४ फेब्रुवारीच्या एअर इंडियाच्या विशेष विमानातूनही विद्यार्थी आले आहे. कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप सिंग म्हणतात, ‘‘तीन विमान कंपन्यांचे विमाने युक्रेनमधून उड्डाण घेत आहेत. तीन विशेष फेऱ्यांनंतर आता २६ फेब्रुवारी आणि १ मार्चलाही विमाने युक्रेनमधून येणार आहेत.

बुधवार पर्यंत विविध मार्गातून ५०० हून अधिक विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम्ही दुतावासाबरोबर संपर्कात असून, जास्तितजास्त विद्यार्थ्यांना परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे.’’ दिल्लीला परतल्यानंतर बहुतेक विद्यार्थी आपल्या गृहराज्यात रेल्वे किंवा विमानाने जात आहे.

या विद्यापीठांत भारतीय विद्यार्थी

युक्रेन मधील बोगोमोलेट्स नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, खारकीव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, द्वनिप्रो स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी सारख्या उच्चवैद्यकीय विद्यापिठात जवळपास १८ हजार ते २० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील जवळपास १२०० हुन अधिक विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत.

केंद्राला पत्र

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. यासंबंधी पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि गृहमंत्र्यांनी लक्ष घालून, मुलांची तातडीने महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करावी, अशा आशयाचे प्रश्न उच्च व तंत्रशित्रण मंत्री उदय सामंत यांनी केंद्राला लिहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com