Ukraine: रशियातील सर्वसामान्यांना युद्धाचा दणका; जनतेचे प्रचंड हाल

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर तेथील जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.
Ukraine Russia War
Ukraine Russia War Google

मॉस्को - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्यानंतर तेथील जनतेचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. अमेरिकेसह युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले असून यामुळे सामान्य जनता होरपळू लागली असून प्रत्येकजण अध्यक्ष पुतीन यांना शिव्या घालताना दिसतो आहे. युरोपीय देशांनी रशियन बॅंकांवर कठोर निर्बंध घातले असून त्यामुळे संपूर्ण रशियातील बॅंकींग व्यवस्था ठप्प झाली असून डॉलरच्या तुलनेत रशियन रूबलचे अवमूल्यन होताना दिसत आहे. सर्वसामान्य रशियन नागरिक रोख पैशाला पारखा झाला असून खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे.

देशाच्या अनेक भागांमध्ये आज पैसे काढण्यासाठी नागरिकांनी एटीएमबाहेर रांगा लावल्या होत्या. पाश्चिमात्य देशांनी अन्य बड्या बॅंकांमधील रशियाची संपत्ती गोठविली असून मुख्य जागतिक बॅंकींग प्रणाली ‘स्विफ्ट’मधून देखील रशियाला वगळण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडला कात्री लावण्याचा इरादा अमेरिकेने बोलून दाखविला असून त्यामुळे रशियाला ६३० अब्ज अमेरिकी डॉलरचा फटका बसू शकतो.

Ukraine Russia War
UP Election: झोपडीतून प्रचार करणारी 'ही' उमेदवार कोण आहे? जाणून घ्या

रशियाकवर मंदीची छाया

रशियामध्ये सध्या अराजकसदृश्य स्थिती निर्माण झाली असून हा देश लवकरच महामंदीच्या तडाख्यात सापडू शकतो अशी भीती आर्थिकक्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. लोकांची बॅंकांमधील जमापुंजी संकटात सापडली असून प्रत्येकजण चलन मिळविण्यासाठी रस्त्यांवर धावताना दिसतो आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी देखील रशियामध्ये गुंतवणूक करण्यापासून हात आखडता घेतला आहे.

‘रूबल’च्या किमती घसरल्या

अनेक लोकांना रशियन ‘रूबल’च्या बदल्यात अन्य देशांचे चलन घ्यायचे आहे पण त्यांनीही निर्बंधांमुळे खरेदी करणे अशक्य होऊन बसले आहे. रूबलच्या किमती घसरल्याने लोकांची मोठी कोंडी झाली आहे. आता एका डॉलरसाठी नागरिकांना ११३ रूबल द्यावे लागत आहेत. रूबलचे हे अवमूल्यन रोखले नाही तर रशियात आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकतो.

  • आर्थिक संकट

  • रशियामध्ये देशांतर्गत बेरोजगारी वाढण्याची भीती

  • अनेक बॅंका, वित्तीय संस्था दिवाळखोरीच्या वाटेवर

  • मॉस्कोच्या रोखे बाजारावर अस्थिरतेची छाया

  • निर्बंधामुळे आयात- निर्यात व्यापारासही फटका

  • कमकुवत घटक कर्जबाजारी होण्याची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com