
Ukraine Russia War : रशियाने हल्ला करताच युक्रेनने शेअर केले कार्टून
युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्धाचा (Ukraine Russia War) भडका अखेर उडालाच. रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा केली आणि युक्रेनच्या अनेक भागात स्फोटांचे आवाज येऊ लागले. दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील संपूर्ण जगाला रशियाशी संबंध तोडण्याचे आवाहन केले. तसेच युक्रेनने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरून (Ukraine Twitter Account) एक कार्टून ट्विट केले.
हेही वाचा: Ukraine-Russia War Live : पन्नास रशियन घुसखोर ठार; युक्रेनचा दावा
रशियाने (Russia) लष्करी हल्ला केल्यानंतर युक्रेनने (Ukraine) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अॅडोल्फ हिटलर (Adolf Hitler) आणि व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांचे एक कार्टून (Cartoon) शेअर केले. या कार्टूनला युक्रेनने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. मात्र या कार्टूनमध्ये हिटलर पुतिनला कुरवाळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. युक्रेनने या कार्टूनद्वारे पुतिन यांना हिटलरच्याच पंक्तीत बसलवले आहे.
हेही वाचा: शस्त्र वापरता येणाऱ्याने लष्करात यावं; युक्रेनचं आवाहन
आज (दि. २४) सकाळी 11 च्या सुमारास केलेले हे ट्विट सध्या 90 हजार लोकांनी रिट्विट केले आहे. तर जवळपास साडेतीन लाख लोकांनी हे ट्विट लाईक केले आहे. रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेल्या लष्करी कारवाईत आतापर्यंत 7 लोकांचे प्राण गेले असून 9 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत आहे. हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. युक्रेनच्या गृह मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशभरात सर्वत्र बॉम्ब शेलिंग होत आहे. रशियन लष्कराने आम्ही युक्रेनचे एअरबेस आणि लष्करी इमारतींना टार्गेट करत असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा: 'ते थेट नरकात जातात', युक्रेन-रशिया UN च्या बैठकीतही एकमेकांना भिडले
Web Title: Ukraine Tweeted Cartoon Of Adolf Hitler Vladimir Putin After Russia Started Military Operation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..