‘फोटोशूट’ करणाऱ्या झेलेन्स्कींवर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine Volodymyr Zelensky wife Olena Zelenska criticized photo shoot for magazine Vogue

‘फोटोशूट’ करणाऱ्या झेलेन्स्कींवर टीका

वॉशिंग्टन : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसताना युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदोमिर झेलेन्स्की आणि त्यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्का यांनी अमेरिकेतील ‘व्होग’ या नियतकालिकासाठी केलेल्या फोटोशूटमुळे त्यांच्यावर टीका होत आहे. ‘व्होग’ नियतकालिकात ओलेना यांच्यावर लेख आला असून त्यासाठी हे फोटोशूट करण्यात आले होते. मात्र, नियतकालिकाचा हा अंक प्रसिद्ध होताच झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेतून जोरदार टीका होत आहे. अमेरिकेने युक्रेनसाठी खर्च केलेले ६० अब्ज डॉलर वाया गेले, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांनीही दिली आहे.

‘आपण युक्रेनला युद्धासाठी ६० अब्ज डॉलर पाठवत असताना झेलेन्स्की मात्र फोटोशूट करण्यात मग्न आहेत. हे लोक आपल्याला मूर्खच समजतात,’ अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या खासदार लॉरेन बोबर्ट यांनी केली आहे. ‘व्होग’मध्ये ओलेना झेलेन्स्का यांची काही छायाचित्रे प्रसिद्ध झाली असून त्यापैकी एकामध्ये व्होलोदोमिर हेदेखील आहेत. तुमचा देश युद्धाला सामोरे जात असताना फोटोशूट करण्याची ही वेळ आहे का?, अशीही टीका झेलेन्स्की यांच्यावर होत आहे. काही जणांनी मात्र झेलेन्स्की यांचे समर्थन केले आहे. ‘युक्रेनला मदतीची गरज असून त्यांना ती मिळायलाच हवी. आतापर्यंत पाठविलेले पैसे फोटोशूटसाठी वापरलेले नाहीत,’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस सदस्या मायरा फ्लोरेस यांनी दिली आहे.

किव्हवर हल्ले

रशियाने आज युक्रेनची राजधानी किव्ह, चेर्निहिव्ह या दोन शहरांवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. गेल्या अनेक आठवड्यांत रशियाने या शहरांवर हल्ले केले नव्हते. खेरसन येथेही रशियाने आज जोरदार हल्ले केले. रशियाच्या हल्ल्यांपासून कोणतेही शहर सुरक्षित नाही, अशी चिंता युक्रेन सरकारने व्यक्त केली आहे.

Web Title: Ukraine Volodymyr Zelensky Wife Olena Zelenska Criticized Photo Shoot For Magazine Vogue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top