Iran Plane Crash : इराणमध्ये विमान कोसळले; 180 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 8 जानेवारी 2020

तेहरानजवळील इमाम खोमेईनी विमातनळावरुन या विमानाचे उड्डाण झाले होते. उड्डाणाच्या काही मिनिटांतच हे विमान कोसळले.

तेहरान : इराणमध्ये सध्या सगळ्याच खळबळजनक घडामोडी घडत असून पुन्हा एक धक्कादायक घटना घडली आहे. इराणची राजधानी तेहरान येथे बोईंग 737 या विमानाला अपघात होऊन ते कोसळले आहे. युक्रेन एअरलाईन्सच्या या विमानात 180 प्रवासी होते, सर्वांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Video : इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला; कासीम सुलेमानींच्या हत्येचा घेतला बदला

तेहरानजवळील इमाम खोमेईनी विमातनळावरुन या विमानाचे उड्डाण झाले होते. उड्डाणाच्या काही मिनिटांतच तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले. या अपघातात सर्वच्या सर्व 180 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तपासपथक दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचले असून शोधकार्य सुरू असल्याचे नागरी उड्डाण विभागाचे अधिकारी रेझा जफरझादेह यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आज पहाटेच इराणने इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांनर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यानंतर अमेरिकेच्या हवाई विमानांना इराक, इराण व आखाती देशांमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आला अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ukrainian boing 737 crashed at Tehran Iran