Amritpal Singh
Amritpal SinghSakal

Amritpal Singh: खलिस्तानी समर्थकांनी भारतीय ध्वज खाली खेचला; परराष्ट्र मंत्रालयाने ब्रिटनला झापलं!

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तालयातून भारतीय ध्वज खाली खेचल्याने परराष्ट्र मंत्रालयाने काल संध्याकाळी उशीरा दिल्लीतल्या ब्रिटनच्या वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स बजावलं आहे. फुटीरतावादी अमृतपाल सिंग याच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी ध्वज खाली खेचला. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयाने उच्चायुक्तालयातल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल तीव्र शब्दात सुनावलं आहे. भारतीय अधिकारी आणि राजदूतांबद्दल ब्रिटनची उदासीन भूमिका अस्वीकारार्ह असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.

काल सायंकाळपासून या कारवाईला विरोध सुरू झाला. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सेलफोन व्हिडिओंमध्ये निदर्शक इमारतीवर चढताना आणि भारताचा ध्वज उतरवताना दिसत आहेत.

"या घटकांना हाय कमिशनच्या आवारात प्रवेश करण्याची परवानगी देणार्‍या ब्रिटिश सुरक्षेच्या पूर्ण अनुपस्थितीबद्दल स्पष्टीकरण मागितले गेले. व्हिएन्ना कन्व्हेन्शन अंतर्गत यूके सरकारच्या मूलभूत कर्तव्यांची आठवण करून देण्यात आली," असे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

"आजच्या घटनेत सामील असलेल्या प्रत्येकाची ओळख पटवण्यासाठी, अटक करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी यूके सरकार तात्काळ पावले उचलेल आणि अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करेल अशी अपेक्षा आहे," असे निवेदनात म्हटले आहे.

आठवड्याच्या शेवटी अमृतपाल सिंगच्या ११२ समर्थकांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग फरार आहे. त्यांच्यापैकी एकाची सुटका करण्यासाठी त्यांनी तलवारी आणि बंदुकांसह पोलीस ठाण्यात घुसल्यानंतर कारवाईला सुरुवात झाली. या चकमकीत सहा पोलीस अधिकारी जखमी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com