युएनमधून होणार रशियाची हाकालपट्टी? आमसभेची बोलावली तातडी बैठक

या विशेष सभेत मतदानाला झाली सुरुवात
UNHRC
UNHRC
Updated on

न्यूयॉर्क : युक्रेनवर आक्रमण आणि सुमारे दीड महिन्यापासून सुरु असलेल्या युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेतून हाकालपट्टी होण्याची शक्यता आहे. यासाठी युएनच्या आमसभेची तातडीची विशेष सभा बोलावण्यात आली असून रशियाविरोधात इथं मतदानाला सुरुवात झाली आहे. (UN General Assembly emergency special session begins to vote on removing Russia from UNHRC)

या सभेत युक्रेनचे प्रतिनिधी म्हणाले, UNHRC मधून रशियन फेडरेशनचं सदस्यत्व रद्द करण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. तर युक्रेनच्या भूमिकेला विरोध करताना रशियाच्या प्रतिनिधींनी म्हटलं की, "आम्ही हा ठराव मांडू इच्छितो आणि इथं उपस्थित असलेल्या सर्वांना आपल्या निर्णयाचा विचार करण्याचं आवाहन करतो. तसेच पाश्चात्य देश आणि त्यांच्या सहयोगी देशांनी विद्यमान मानवी हक्क संरचना नष्ट करण्याच्या प्रयत्नाविरुद्ध मतदान करण्याचंही आम्ही आवाहन करू इच्छितो"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com