
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने (यूएनएससी) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. तसेच या निंदनीय दहशतवादी कृत्यातील दोषी आणि त्यांच्या मदतनीसांना जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांना न्यायाच्या चौकटीत आणले पाहिजे, असे मत व्यक्त केले.