UNISEF Day 2022: अख्ख्या जगात ख्याती असणाऱ्या यूनिसेफ संघटनेचं नेमकं कार्य काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UNISEF Day 2022

UNISEF Day 2022: अख्ख्या जगात ख्याती असणाऱ्या यूनिसेफ संघटनेचं नेमकं कार्य काय?

UNISEF Day: दरवर्षी 11 नोव्हेंबरला यूनिसेफ दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1947 मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. यूनिसेफ ही जगभऱ्यातील मुलांचा उद्धार करणारी महत्वाची संस्था असली तरी याबात अनेकांना फारसं काही माहिती नाही. किंवा फार कमी माहितीये. तेव्हा आज आपण यूनिसेफ दिनाच्या निमित्ताने त्याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

दुसऱ्या महायुद्धानंतर युनिसेफची स्थापना झाली होती

दुसऱ्या महायुद्धानंतर मुलांच्या आरोग्याची काळजी, शिक्षण, सर्वसामान्य मुलांच्या एकंरीत कल्याणासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. UNISEF चा पूर्ण अर्थ United Nations International Children's Emergency Fund असा आहे.

या संस्थेचं काम काय?

बालपणापासून ते किशोरावस्थेपर्यंत मुलांचे जीवन वाचवणे, त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांची कार्यक्षमतेनुसार त्यांच्या कला गुणांना वावा देण्याच्या उद्देशाने युनिसेफ एकूण १९० देशांमध्ये कार्य करते. युनिसेफ संस्था निपक्षपातीपणे काम करते. कोणत्याही देशातील सोईसुविधांनी वंचित असलेल्या तसेच सर्वाधिक गरजू व्यक्तींचे अधिकार जपण्यासाठी ही संस्था सातत्याने झटते.

हेही वाचा: Mountain Day : महाराष्ट्रातले 'हे' शिखर ट्रेकींगसाठी उत्तम...

युनिसेफचे उद्दिष्ट, आपल्या देशाच्या कार्यक्रमांद्वारे, महिला आणि मुलींच्या समान हक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या समुदायाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये त्यांच्या पूर्ण सहभागास समर्थन देणे आहे.