सिरींजच्या निर्मितीसाठी ‘युनिसेफ’चा पुढाकार

पीटीआय
Wednesday, 21 October 2020

जगात सर्वांपर्यंत कोरोनाची लस पोचविण्यासाठी युनिसेफने कंबर कसली असून त्यासाठी प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात केली आहे. लसीकरणासाठी लागणाऱ्या गोष्टी आधीपासूनच तयार करून ठेवण्यावर युनिसेफचा  भर आहे.

न्यूयॉर्क - जगभरातील संशोधनसंस्था कोरोना लशीच्या निर्मितीसाठी युद्धपातळीवर संशोधन करत असल्याने ही लस पुढील वर्षी बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे. एकदा का ही लस तयार झाली की ती सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी आवश्‍यक लागणाऱ्या सिरींजचा युनिसेफ साठा करून ठेवणार आहे. युनिसेफच्या मालकीच्या वेअरहाउसमध्ये ५२० दशलक्ष सिरींजचा साठा करण्यात येणार असून इंजेक्शनसाठी लागणाऱ्या एक अब्ज सुया  देखील तयार ठेवल्या जाणार आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत युनिसेफने हा साठा करून ठेवण्याचे ध्येय निश्‍चित  केले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जगात सर्वांपर्यंत कोरोनाची लस पोचविण्यासाठी युनिसेफने कंबर कसली असून त्यासाठी प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात केली आहे. लसीकरणासाठी लागणाऱ्या गोष्टी आधीपासूनच तयार करून ठेवण्यावर युनिसेफचा  भर आहे.

निर्मिती प्रमाण वाढवावे लागणार
दरवर्षी जगभर केल्या जाणाऱ्या कोरोनाच्या लसीकरणामध्ये युनिसेफचा मोठा वाटा असतो. ही संस्था मुलांच्या लसीकरणासाठी सहाशे ते आठशे दशलक्ष सिरींज उपलब्ध करून देते. कोरोनाच्या लशीकरणासाठी या सिरींजची तिप्पट आणि चौपटपटीने निर्मिती करावी लागेल असे युनिसेफच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनावरील लसीकरणाची मोहीम ही मानवी इतिहासातील जगातील आतापर्यंतची सर्वांत मोठी मोहीम असेल. एकदा का कोरोनावर लस तयार झाली की आम्हाला ती तातडीने सर्वांपर्यंत पोचवावी लागेल.
- हेनेरिट्टा फोरे, कार्यकारी संचालक युनिसेफ

तातडीने लस पोचवावी लागणार
कोरोना लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर देखील तिच्या वापरासाठी आरोग्य यंत्रणेची परवानगी मिळणे गरजेचे आहे,  पण एकदा का ही लस तयार झाली की ती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी तातडीने लसीकरणासाठीच्या संसाधनांची आवश्‍यकता भासेल. जगभरामध्ये मुबलक प्रमाणात कोरोना लस उपलब्ध करून देण्यावर यंत्रणांचा भर असेल.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UNICEF initiative to produce Syringes