ब्रेकिंग : फरार नीरव मोदीला भारतात धाडणार; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजूरी

पंजाब नॅशनल बँकेमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता.
ब्रेकिंग : फरार नीरव मोदीला भारतात धाडणार; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजूरी

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हिऱ्यांचा व्यापारी नीरव मोदी भारतातून फरार झाला होता. फरार झालेला नीरव मोदी लंडनमध्ये राहत असल्याची माहिती माध्यमांमधून जगासमोर आली होती. नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला होता. त्यानुसार आता आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याला मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ब्रेकिंग : फरार नीरव मोदीला भारतात धाडणार; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजूरी
दोन दिवसांत कुंभमेळ्यात एक हजार ‘पॉझिटिव्ह’ !

याआधी कोर्टाने निर्णय देताना म्हटलं होतं की, नीरव मोदीच्या विरोधात भारतामध्ये एक खटला दाखल आहे ज्याचं त्याला उत्तर द्यावं लागेल. नीरव मोदीने पुरावे नष्ट करणे तसेच साक्षीदारांना भीती घालण्याचा कट रचला होता. कोर्टाने पुढे म्हटलंय की, नीरव मोदीला मुंबईमधील ऑर्थर रोड जेलमध्ये योग्य ते औषधोपचार आणि मानसिक आरोग्यासाठी सुविधा पुरवल्या जातील.

याआधी नीरव मोदीने आपल्या विरोधातील 'एक्ट्रॅडीक्शन' आदेशाला कोर्टात आव्हान दिलं होतं. दोन वर्ष कायदेशीर लढाई लढल्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायाधीश सॅम्यूअल गूजी यांनी निर्णय दिला होता की, नीरव मोदीच्या विरोधात कायदेशीर खटला आहे, ज्यामध्ये त्याला भारतीय न्यायालयासमोर दाखल व्हावं लागेल आणि त्याच निर्णयानुसार ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी यास मंजूरी दिली आहे.

ब्रेकिंग : फरार नीरव मोदीला भारतात धाडणार; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजूरी
उच्च शिक्षणासाठी पुण्या-मुंबईपेक्षा स्थानिक महाविद्यालयात प्रवेश निश्‍चिती

दोन वर्षांपूर्वी नीरव मोदीला ब्रिटनच्या स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी 13 मार्च 2019 रोजी लंडनमधून अटक केली होती. त्यानंतर तो साऊथ वेस्ट लंडनच्या वँड्सवर्थ जेलमध्ये कैद आहे. सुनावणीसाठी नीरव मोदी व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगद्वारे वँड्सवर्थ जेलसमोर दाखल व्हायचा.

180 कोटी डॉलरचा मालक

फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये नीरव मोदीची एकूण संपत्ती 180 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 11,700 कोटी रुपये होती. नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. मार्च 2018 मध्ये नीरव मोदीने न्यूयॉर्कमध्ये बँकरप्सी प्रोटेक्शनच्या अंतर्गत याचिका दाखल केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com