पर्यटन क्षेत्राचे नुकसान 320 अब्ज डॉलर;संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

वृत्तसंस्था
Thursday, 30 July 2020

2009 मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळातील नुकसानाच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीने जास्त आहे.लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमाण तीनशे दशलक्षाने घटले. टक्केवारीत हे 56 आहे.

जीनिव्हा - कोरोनाच्या जागतिक साथीमुळे पर्यटन उद्योगाचे पहिल्या पाच महिन्यांतील नुकसान 320 अब्ज डॉलर इतके आहे. संयुक्त राष्ट्रांकडून (युएन) अहवाल तयार करण्यात आला आहे. यानुसार जगभरातील लाखो लोकांचे उपजीविकेचे माध्यम धोक्यात आले.

माद्रिदस्थित जागतिक पर्यटन संघटनेने एक निवेदन जारी केले आहे. 2009 मधील जागतिक आर्थिक मंदीच्या काळातील नुकसानाच्या तुलनेत हे प्रमाण तिपटीने जास्त आहे. लॉकडाऊनमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे प्रमाण तीनशे दशलक्षाने घटले. टक्केवारीत हे 56 आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन संस्थेचे सरचिटणीस झुराब पोलोलिकाश्वीली यांनी सांगितले की, ताज्या आकडेवारीनुसार पर्यटन पुन्हा सुरु करणे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते.

आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे दोन मुख्य स्रोत म्हणून अमेरिका आणि चीन या देशांचा उल्लेख केला जातो, पण दोन्ही देश ठप्प झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वास्तविक गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या प्रमाणात चार टक्के वाढ झाली होती. हा आकडा दीड अब्ज इतका होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धोका कायम
काही ठिकाणी पर्यटन हळूहळू सुरु होत असले तरी संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता आणि त्यामुळे लॉकडाउन पुन्हा लागू होण्याच्या शक्यतेने धोका कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United Nations report Coronavirus Cost Global Tourism $320 Billion