चीनच्या धमकीकडे अमेरिकेने केले दुर्लक्ष, तैवानशी व्यापार वाढीवर भर

तैवानशी व्यापार वाढीवर भर
China-and-America
China-and-America

जागतिक पुरवठा साखळीत होत असलेला बदल पाहाता जगातील सर्व प्रमुख देश बचावासाठी धडपड करु लागले आहेत. भारत देशातच सेमिकंडक्टर हब बनवण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे अमेरिका तैवानबरोबर (Taiwan) आर्थिक संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करित आहे. त्यासाठी अमेरिकेने निश्चित केले आहे, की चीनच्या सर्व इशाऱ्यांकडे लक्ष देणार नाही. उलट त्याकडे दुर्लक्ष करणार आहे. (United States Deepen Economic Ties With Taiwan Despite Chinese Opposition)

China-and-America
...तर अमेरिकन सैन्य चीन विरोधात उभे राहणार; बायडेन यांचे मोठे विधान

चीनने दिला अमेरिकेला इशारा

वृत्तानुसार, अमेरिका (America) आणि तैवान आर्थिक संबंधांना मजबूत बनवण्यासाठी लवकरच चर्चा सुरु करणार आहे. हे सर्व अशा वेळी होत आहे, की चीनने अमेरिकेला तैवानशी संबंध वाढू नये असा इशारा दिला आहे. नुकतेच जपानमध्ये क्वाॅड परिषदेत अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी तैवानवर खुलेपणे आपले मत मांडले होते. बायडेन म्हणाले, जर चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका प्रत्यक्षपणे तैवानबरोबर असेल.

China-and-America
China-Russia : तैवान हा चीनचाच भाग - पुतीन

अमेरिका-तैवान दरम्यान व्यापार

अमेरिकेच्या वाणिज्य विभागानुसार तैवान आता अमेरिकेचा ९ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आकड्यानुसार वर्ष २०२० मध्ये दोन्ही देशांदरम्यान १०५.९ बिलियन डाॅलर वस्तू व सेवांचा व्यापार झाला. त्यातून तैवानने अमेरिकेतून ३९.१ बिलियन डाॅलरचे वस्तू व सेवा खरेदी केले. दुसरीकडे अमेरिकेने तैवानकडून ६६.७ बिलियन डाॅलरची आयात केली. अमेरिका प्रामुख्याने तैवानला यंत्र, इलेक्ट्रिक मशिनरी, नैसर्गिक इंधन, ऑप्टिकल अँड मेडिकल इंस्ट्रमेंट आणि विमाने विकतो. तैवानकडून अमेरिका इलेक्ट्रिक मशिनरी, मशिनरी, वाहने, स्टील आणि प्लास्टिक खरेदी करतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com