esakal | हाँगकाँगबरोबरचे द्विपक्षीय करार अमेरिका संपविणार
sakal

बोलून बातमी शोधा

Morgan-Ortagus

अमेरिकेचा हा एकतर्फी निर्णय द्विपक्षीयता आणि बहुपक्षीयतेचा अनादर करणारा असून आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्याचा निषेध करायला हवा, असे हाँगकाँग सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.....

हाँगकाँगबरोबरचे द्विपक्षीय करार अमेरिका संपविणार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - अमेरिकेने हाँगकाँगबरोबरील तीन द्विपक्षीय करार संपविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गुन्हेगार प्रत्यार्पण कराराचा समावेश आहे. चीनने हाँगकाँगवर वादग्रस्त राष्ट्रीय सुरक्षेचा कायदा लादल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

आशियातील प्रमुख व्यापार केंद्र समजल्या जाणाऱ्या हाँगकाँगमधील स्वायत्तता आणि लोकशाही स्वातंत्र्य संपविण्यासाठी चीनने हा कायदा लादला आहे. एकेकाळी ब्रिटिश वसाहत असणाऱ्या हाँगकाँगवर पूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी चीनने राष्ट्रीय सुरक्षेचा कायदा पारित केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महिनाभरापूर्वीच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगचा विशेष दर्जा काढून घेतला. 

हे करार रद्द
१.फरार गुन्हेगारांचे प्रत्यार्पण
२. शिक्षा सुनावलेल्या व्यक्तींचे हस्तांतरण
३. जहाजांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर सवलत

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हाँगकाँगकडून अमेरिकेचा निषेध
अमेरिकेच्या तीन द्विराष्ट्रीय करार संपविण्याच्या निर्णयाचा हाँगकाँगने मात्र निषेध केला आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटननंतर अमेरिकेनही हा निर्णय घेतला. अमेरिकेचा हा एकतर्फी निर्णय द्विपक्षीयता आणि बहुपक्षीयतेचा अनादर करणारा असून आंतरराष्ट्रीय समुदायानेही त्याचा निषेध करायला हवा, असे हाँगकाँग सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

चीनने हाँगकाँगवर राष्ट्रीय सुरक्षेचा कायदा लादून हाँगकाँगच्या नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. त्यावर अमेरिकेने हाँगकाँगबरोबरचे तीन द्विराष्ट्रीय करार संपविण्याचा निर्णय घेऊन आपल्याला वाटणारी तीव्र काळजी व्यक्त केली आहे. 
मॉर्गन ओर्टागस, प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय, अमेरिका

loading image
go to top