भारताच्या मदतीसाठी अमेरिका बांधील - कमला हॅरिस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamala Harris

भारताच्या मदतीसाठी अमेरिका बांधील - कमला हॅरिस

वॉशिंग्टन - कोरोना रुग्णांची (Corna Patient) संख्या आणि मृत्यू दर (Death Rate) वाढत असताना भारताला (India) मदत (Help) करण्याचा निश्‍चय अध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) प्रशासनाने (Administrative) केला असल्याची ग्वाही देत भारत सुस्थितीत राहण्यात अमेरिकेचेही (America) हित आहे, असे अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी स्पष्ट केले. (United States is committed to helping India Kamala Harris)

त्या म्हणाल्या, कोरोनामुळे भारतातील स्थिती ही हृदयद्रावक असून या साथीला लढा देण्यासाठी भारताला मदत करण्याचा निर्धार संपूर्ण बायडेन प्रशासनाने केला आहे. या जागतिक साथीच्या सुरुवातीस आमच्या रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता जाणवत होती, तेव्हा भारताने मदत पाठविली होती आणि आज भारताला गरज असताना आम्ही त्यांना मदत करण्यास बांधील आहोत.

‘बोलस्टरिंग यूएस कोविड रिलिफ एफर्डस इन इंडिया ः परस्पेक्टिव्ह फ्रॉम द डायसपोरा’ या कार्यक्रमात शुक्रवारी त्या बोलत होत्या. ‘‘एक मित्र, आशियाई ‘क्वाड’चा सदस्य आणि जागतिक समुदायाचा एक भाग म्हणून भारतासाठी आम्ही हे सर्व करीत आहोत. देश, प्रांत हे सर्व विसरून आपण एकत्र काम केल्यास या जागतिक संकटातून आपण निश्‍चत बाहेर पडू, असा विश्‍वास हॅरिस यांनी व्यक्त केला. कोरोनाकाळात भारतासाठी दहा कोटी डॉलरची मदत करण्याची घोषणा बायडेन -हॅरिस यांच्या सरकारने केली असून विविध प्रकारची मदत घेऊन सहा विमाने गेल्या आठवड्यात भारतात पोचली आहेत. या विमानांमधून ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, जलद चाचणी किट, औषधे आणि एन९५ मास्क मोठ्या प्रमाणावर पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा: काबुलमध्ये शाळेजवळ बॉम्बस्फोट; 30 जण जागीच ठार

अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यापासून परराष्ट्रीय वकिलात आणि वाणिज्य दूतावासातील पथकांसह संपूर्ण सरकार भारताला आवश्‍यक ती मदत करण्यासाठी झटत आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री टोनी ब्‍लिंकन आणि अन्य वरिष्ठ अधिकारीही भारतातील संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत, अशी माहिती दक्षिण आणि मध्य आशिया व्यवहार विभागाचे वरिष्ठ सल्लागार एरविन मसिंगा यांनी दिली. अमेरिकेच्या सर्व थरांमधून वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर गेल्या महिन्यात झालेला मदतीचा ओघ मी परराष्ट्र मंत्रालयातील २६ वर्षांच्या कारकिर्दीत प्रथमच पाहिला, असेही ते म्हणाले.

भारताला मदतीचे आवाहन

भारतासाठी निधी उभारण्यासंबंधीचे निवेदन अमेरिकेतील प्रतिनिधीगृहातील भारतीय वंशाच्या सदस्या प्रमिला जयपाल यांनी प्रसिद्ध केले. ‘‘भारताला आपल्या मदतीची गरज आहे आणि या आव्हानाला सामोरे जाण्याची आपल्यावर नैतिक जबाबदारी आहे. ही जागतिक साथ आहे आणि सगळीकडच्या विषाणूंचा नायनाट केल्याशिवाय आपण त्यातून संपूर्णपणे बाहेर पडू शकणार नाही,’’असे त्या म्हणाल्या.

अमेरिकेतील भारतीयांचाही पुढाकार

अमेरिकेतील भारतीयांनीही लाखो डॉलरचा निधी जमविली असून अत्यावश्‍यक सेवांसह वैद्यकीय उपकरणे, औषधे भारतात पाठविण्यात येत आहे. ‘सेवा इंटरनॅशनल यूएस’ या संस्थेने एक कोटी डॉलरपेक्षा जास्त देणगी गोळा केली आहे. भारतीय वंशांच्या डॉक्टरांच्या ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशियन’ (एएपीआय) या संस्थेने ३५ लाख डॉलर तर ‘इंडियासपोरा’ने २० लाख डॉलरचा निधी जमविला आहे.

Web Title: United States Is Committed To Helping India Kamala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top