इराणवरील निर्बंधांवरून अमेरिका एकाकी

पीटीआय
Friday, 18 September 2020

अमेरिकेने २०१५ पूर्वी संयुक्त राष्ट्रांची इराणवर असलेली सर्व बंधने पुन्हा लागू करण्याची तयारी अमेरिका करत आहे. या करारामधील इतर देशांनी मात्र अमेरिकेच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिका इराणवर सर्व निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, असा इशारा काही देशांनी दिला आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

इराणने अण्वस्त्रबंदी करण्याच्या बदल्यात त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध हटविण्याचा करार अमेरिकेसह सहा जगातिक शक्तींनी २०१५ मध्ये केला होता. या करारानंतर इराणवरील निर्बंध जाऊन त्यांना व्यापार करणे शक्य झाले होते. मात्र, इराण कराराचे पालन करत नसल्याचे सांगत अमेरिकेने या करारातून मागेच अंग काढून घेतले. अमेरिकेने २०१५ पूर्वी संयुक्त राष्ट्रांची इराणवर असलेली सर्व बंधने पुन्हा लागू करण्याची तयारी अमेरिका करत आहे. या करारामधील इतर देशांनी मात्र अमेरिकेच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: United States is preparing to reimpose sanctions on Iran