अजब! पोटदुखीला अपेंडिक्स समजून गेली रुग्णालयात अन् १५ मिनिटांत दिला बाळाला जन्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy

अजब! पोटदुखीला अपेंडिक्स समजून गेली रुग्णालयात अन् १५ मिनिटांत दिला बाळाला जन्म

वॉशिग्टन - विद्यापीठात शिकणारी मुलगी पोटदुखीच्या त्रासाला अपेंडिक्सचा त्रास समजत होती. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर तरुणीने अवघ्या 15 मिनिटांत गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना घडली आहे. बाळाला जन्म देण्याच्या १५ मिनिटांपूर्वी तरुणीला ती गर्भवती असल्याचे समजलं. वास्तविक, तरुणी गुप्त गर्भधारणेच्या आजाराने त्रस्त होती. ()

कायला सिम्पसन असं तरुणीचं नाव असून ती अमेरिकेतील इंडियाना विद्यापीठात शिकते. कायलाला तिच्या गरोदरपणाची माहितीही नव्हती. पोटात दुखल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. याला अपेंडिक्सचा त्रास समजून तिने रुग्णालय गाठलं. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यानंतर तरुणी गरोदर असल्याचं समजलं.

हेही वाचा भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

जेव्हा कायलाच्या कुटुंबीयांना आणि मित्रमंडळींना ही बाब समजली तेव्हा ते गोंधळले. कायला स्वतःही साशंक होती. यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. कायलाने तिच्यासोबत घडलेली घटना टिकटॉक व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. ही घटना गेल्या वर्षी घडली होती.

हेही वाचा: Twitter India layoffs : मस्कने भारतातील 'या' कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

कायला म्हणाली की, तिला स्वतःमध्ये गर्भधारणेशी संबंधित कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. ती बारीक होती, बेबी बंप सुद्धा दिसत नव्हता. पीरियड्सही नियमित येत होते.

स्त्रिला या प्रकारच्या गर्भधारणेबद्दल माहिती नसते. गुप्त गर्भधारणेचा त्रास असलेल्या स्त्रीला जेव्हा ती बाळाला जन्म देणार असते तेव्हाच ती गरोदर असल्याचं समजतं. webmd.com नुसार, या प्रकारची गर्भधारणा फार दुर्मिळ आहे. हे फार कमी महिलांच्या बाबतीत घडते. कायलाने आपल्या मुलीचे नाव माडी ठेवले असले तरी ती आता माडीच्या वडिलांसोबत रिलेशनशिपमध्ये नाही. आतापर्यंत गुप्त गर्भधारणेशी संबंधित अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

टॅग्स :young girlhealth