‘ऑक्सफर्ड’च्या आवारात उभारणार ‘पूनावाला बिल्डिंग’

‘सीरम लाइफ सायन्सेस’कडून पाच कोटी पौंडांची देणगी; लस संशोधनावर विशेष भर
University of Oxford
University of OxfordSakal

लंडन : जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठाने (University of Oxford) त्यांच्या आवारात ‘पूनावाला व्हॅक्सिन्स रिसर्च बिल्डिंग’ (Poonawala Vaccine Research Building) या नावाने लशीच्या संशोधनासाठी (Research) नवीन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या केंद्रासाठी भारतातील सीरम लाइफ सायन्सेस या संस्थेकडून पाच कोटी ब्रिटिश पौंड इतके अनुदान दिले जाणार आहे.

सीरम लाइफ सायन्सेस ही आदर पूनावाला यांच्या कुटुंबाच्या मालकीची संस्था आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ओल्ड रोड कॅम्पसमध्ये हे संशोधन केंद्र उभारले जाणार असून सुमारे तीनशे संशोधक येथे संशोधन करू शकणार आहेत. या केंद्रामुळे विद्यापीठाच्या लस संशोधन आणि विकास कार्यक्रमाला मोठे बळ आणि वेग मिळणार असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि पूनावाला कुटुंबाचे पूर्वीपासून चांगले संबंध असून २०१९ मध्ये सायप्रस पूनावाला यांना मानद पदवीही विद्यापीठातर्फे देण्यात आली होती.

University of Oxford
जगातील पहिल्या SMS चा होणार इतक्या कोटींना लिलाव

‘पूनावाला बिल्डिंग’मध्ये जेन्नर इन्स्टिट्यूचे मुख्यालय आणि मुख्य प्रयोगशाळा असेल. जगातील या आघाडीच्या लस संशोधन केंद्राला लसीकरणाचे जनक एडवर्ड जेन्नर यांचे नाव देण्यात आले आहे. कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट आणि जेन्नर इन्स्टिट्यूट यांच्यात भागीदारी होऊन ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका लशीचे उत्पादन भारतात वेगाने झाले होते. याशिवाय, जेन्नर इन्स्टिट्यूटने मलेरियावर उपचार म्हणून विकसित केलेल्या नव्या लशीचे उत्पादनही ‘सीरम’ करणार आहे. या लशीच्या सध्या चाचण्यात सुरू आहेत.

या नव्या केंद्रासाठी मोठीच मदत मिळाल्याने आम्ही समाधानी आहोत. या केंद्रामुळे सध्या जागतिक आरोग्यासाठी अत्यावश्‍यक बनलेल्या लशींच्या संशोधनाचे काम आम्हाला अधिक जोमाने करता येईल, असा विश्‍वास वाटतो. पुन्हा कधी जागतिक संसर्गाची लाट आली तर आपण अडचणीत सापडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ.

- प्रा. लुईसि रिचर्डसन, कुलगुरु, ऑक्सफर्ड विद्यापीठ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com