निवडणुकीची लढाई जिंकला पण आयुष्याची हरला; नवनिर्वाचित खासदाराचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 December 2020

नवनिर्वाचित अमेरिकेचे संसद सदस्य ल्यूक लेटलो यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे

वॉशिंग्टन- नवनिर्वाचित अमेरिकेचे संसद सदस्य ल्यूक लेटलो यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे रविवारी त्यांचा शपथविधी होणार होता. ल्यूक जोशूआ लेटलो अमेरिकेच्या लुसियाना राज्यातील राजनिती तज्ज्ञ होते. त्यांना 2020 च्या लुईसियानाच्या 5 व्या काँग्रेससाठी संयुक्त राज्य अमेरिकाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हसाठी निवडलं गेलं होतं. 

लग्नाचं वय नसतानाही मुलगा सज्ञान मुलीसोबत एकत्र राहू शकतो : HC

ल्यूक लेटलो यांनी 18 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाल्याचे सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. ते उत्तर लुसियानाच्या रिचलँड पॅरिशमध्ये असलेल्या घरी आयसोलेट झाले होते. प्रकृती बिघडल्यामुळे 19 डिसेंबरला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. 23 डिसेंबर रोजी त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. पण, मंगळवारी त्यांचे निधन झाले. 41 वर्षाच्या लेटलो यांच्या मागे त्यांच्या पत्नी, जुलिया बरनहिल आणि दोन लहान मुले आहेत. 

ल्यूक मास्क वापरायचे नाहीत

कोरोना विषाणूला हलक्यात घेणे ल्यूक यांना महागात पडले. ते सभेदरम्यान शारीरिक अंतर ठेवण्याचे आवाहन लोकांना करायचे. पण ते अनेकदा मास्क न घालता सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. ट्विटरवरील त्यांच्या फोटोवरुन त्यांनी कधीही मास्क न घातल्याचे दिसते. 

बाबा का ढाब्याच्या मालक झाला लखपती; पोलिसांनी मांडला हिशोब

राजकीय नेत्यांनी व्यक्त केलं दु:ख

लेटलो कोविड-19 मुळे मरणाऱ्या एका हाय रॅकिंग अमेरिकी नेत्यांपैकी आहेत. लूइसियानाच्या गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी झेंडा अर्ध्यापर्यंत आणण्याचा आदेश दिला होता. एडवर्ड्स यांनी लेटलो यांच्या आकस्मिक मृत्यूवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी लेटलो यांच्या परिवाराचेही सांत्वन केले. 

दरम्यान, अमेरिकेसह युरोपमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही 18 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलं आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळल्यामुळे चिंता वाढली आहे. भारतातही काही लोकांमध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us 41 year old republican mp Luke Letlow died coranavirus