US Air Force मधील हिंदू जवानाला मिळाली टिळा लावण्याची परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Darshan Shah, US Air Force

US Air Force मधील हिंदू जवानाला मिळाली टिळा लावण्याची परवानगी

अमेरिकेच्या हवाई दलात (US Air Force) काम करत असलेल्या, भारतीय वंशाच्या व्यक्तीला ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. वायोमिंगमधील एफई वॉरेन या हवाई दलाच्या बेसवर तैनात असलेल्या अमेरिकी हवाई दलाचे एअरमन दर्शन शाह यांना ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी दिली आहे.

हेही वाचा: युक्रेनला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरा; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

एरोस्पेस वैद्यकीय तंत्रज्ञ असलेल्या दर्शन हे दोन वर्षांपूर्वी सेवेत रुजू झाले होते. त्यांची 90 व्या ऑपरेशनल मेडिकल रेडिनेस स्क्वाड्रनपदी नियुक्ती झाली होती. तेव्हापासून ते या मागणीचा पाठपुरावा करत होते.

हेही वाचा: 'काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा, तुम्हाला...', भारतानं चीनला सुनावलं

ऑनलाइन ग्रुप चॅटद्वारे धार्मिक सवलतीची विनंती केल्यानं शाह यांना जगभरातून पाठिंबा मिळाला होता. त्यांना 22 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांना पहिल्यांदाच गणवेशात असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली. "टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधील माझे मित्र मला आणि माझ्या पालकांना सांगतायेत की, हवाई दलात असं काहीतरी घडल्यानं त्यांना खूप आनंद होतोय." असं शाह म्हणाले. "हे काहीतरी नवीन आहे. हे असं काहीतरी आहे जे त्यांनी यापूर्वी कधीही ऐकलं नव्हतं किंवा ते शक्य आहे असंही वाटलं नव्हतं. परंतु ते घडलं." असंही ते यावेळी म्हणाले.

Web Title: Us Air Force Allows Hindu Airman Darshan Shah Wear Tilak In Uniform

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :americaUS