युक्रेनला समर्थन देण्यासाठी रस्त्यावर उतरा; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाविरुद्ध जागतिक निषेधाचे आवाहन केले.
Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky सकाळ डिजिटल टीम

रशिया युक्रेन युद्धाने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. अजूनही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला. युक्रेनला हे युद्ध नको होते, अशी भूमिका युक्रेनची सुरवातीपासून होती. फक्त रशियाच्या हल्ल्यावर प्रतिकार करण्यासाठी आम्ही शस्त्र उचलत आहोत असे युक्रेनचे म्हणणे होते.

रशिया युद्ध थांबवण्यास तयार नसल्याने आता युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी रशियाविरुद्ध जागतिक निषेधाचे (Global Protests) आवाहन केले. (Ukrainian President Volodymyr Zelensky urges global protests against Russia)

झेलेन्स्की म्हणाले, "युक्रेनला समर्थन देण्यासाठी, युक्रेनच्या स्वातंत्र्यासाठी आणि युक्रेनियन लोकांच्या आयुष्यासाठी युक्रेनियन चिन्हांसह तुमच्या चौकात या, रस्त्यावर उतरा, स्वतःला दाखवा आणि सर्वांना ऐकू द्या." झेलेन्स्की यांनी एका व्हिडिओद्वारे आवाहन केले.

Volodymyr Zelensky
काँग्रेस अध्यक्ष कोण होणार? शनिवारी पक्षाची महत्वपूर्ण बैठक

काही दिवसापुर्वी युक्रेनकडून परदेशी नागरिकांना युक्रेनच्या सैन्यात सामील होऊन रशियाविरोधात लढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 27 फेब्रुवारी रोजी, युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक 'आंतरराष्ट्रीय ब्रिगेड' स्थापन करण्याची घोषणा केली होती. ज्याअंतर्गत युक्रेनसाठी लढण्यास इच्छुक असलेले परदेशी नागरिक, त्यांच्या संबंधित देशांतील युक्रेनियन दूतावासांना भेट देऊन लढाईत सहभागी होऊ शकतात. युक्रेनच्या संरक्षणासाठी सैन्यात सामील होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरीकांना आपापल्या देशातील युक्रेनच्या दुतावासांशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com