अमेरिकन पोलिसांच्या गोळीबारात कृष्णवर्णीय युवकाचा मृत्यू; घटनेनंतर लॉस एंजेलिसमध्ये तणावपूर्ण वातावरण

us, ameria
us, ameria

लॉस एंजेलिस: अमेरिकेतील (America)  जॉर्ज फ्लॉयड (George Floyd) या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर उसळलेली लाट अजून शांत झाली नसताना याठिकाणी आणखी एक प्रकरण समोर आले आहे. लॉस एंजेलिसमध्ये अमेरिक पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार घडला तेव्हा मृत व्यक्तीच्या हातात बंदूक होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात पोलिसांच्या गोळीबारात मृत झालेल्या व्यक्ती हा 29 वर्षांचा असून त्याचे नाव  डिजोन किज्जी असे आहे. 

सोमवारी डिजोन साइकलवरुन जात असताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने सायकल सोडून पळ काढला, असे पोलिसांचे म्हणने आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने एका पोलिस कर्मचाऱ्यावर हातही उचलला. ज्यावेळी त्याच्यासोबत झटापट झाली त्यावेळी त्याच्या कपड्यांतून काळ्या रंगाची सेमी अॅटोमॅटिक गन खाली पडली. त्यामुळे पोलिसांनी त्याला गोळी मारली, अशी माहिती देखील  पोलिस अधिकारी डीन यांनी पत्रकारांना दिली आहे.

डिजोन नावाच्या युवकाने बंदुक खाली पडल्यानंतर ती उचलण्याचा प्रयत्न केला होता का? या प्रश्नाचे उत्तर अद्याप गुलदस्त्यातच आहे. घटनेवेळी उपस्थिती अधिकाऱ्यांची यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यातूनच यासंदर्भातील अधिक माहिती समोर येईल, असे पोलिस अधिकारी डीन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  पोलिस नागरिकांना सुरक्षा पुरवण्यासाठी आहेत की त्यांना संपवण्यासाठी असा संतप्त सवाल घटनास्थळी एका महिलेने विचारला आहे. या प्रश्नावरुन हे प्रकरण आणखी तापण्याचे संकेत दिसतात. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील केनोशा शहरात पोलिसांच्या गोळीबारात  कृष्णवर्णीयाचा मृत्यू झाल्याप्रकरणात तीन दिवस वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले होते. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. तर एकजण गंभीर जखमी झाला होता. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कनोशा शहराच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला होता. तत्पूर्वी जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंततर अमेरिकेत वातावारण तापल्याचे पाहायला मिळाले होते. याचे पडसाद जगभरात उमटले होते. अनेक क्षेत्रातून याप्रकरणात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. हे प्रकरण कोणते वळण घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com