

US Action Against Venezuela President
Esakal
नव्या वर्षात नव्या युद्धाची ठिणगी पडलीय. अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हल्ले केलेत. इतकंच नाही तर थेट व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना बेड्या घालून अटक केली आहे. अमेरिकन लष्कराने त्यांना ताब्यात घेतलं असून चेहऱ्यावर काळी पट्टी बांधली आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा फोटो शेअर केला आहे. मादुरो हे त्यांच्या बेडरूममध्ये झोपले असताना त्यांना ताब्यात घेतलंय. त्यांना ओढत खोलीतून बाहेर काढण्यात आलं.