'इमरान खान यांना अमेरिकन ब्लॉगरसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध'

टीम ई-सकाळ
Sunday, 7 June 2020

पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन ब्लॉगर महिलेने पाकच्या माजी गृहमंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. रेहमान मलिक असे या माजी मंत्र्याचे नाव आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यानी अमेरिकन ब्लॉगरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. पाकचे विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी देखील या महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली होती, असा धक्कादायक दावा पाकिस्तानचे टिव्ही होस्ट अली सलीम उर्फ बेगम नवाजिश यांनी केलाय. खुद्द पीडित अमेरिकन ब्लॉगरने यासंबंधी मला सांगितले होते, असे अली सलीम यांनी म्हटले आहे.  

डोनाल्ड ट्रम्प यांना तिहेरी धक्का; ट्विटर, फेसबुकसह इन्स्टाग्रामने केली 'ही' कारवाई

पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या अमेरिकन ब्लॉगर महिलेने पाकच्या माजी गृहमंत्र्याने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. रेहमान मलिक असे या माजी मंत्र्याचे नाव आहे. त्यांच्याशिवाय माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. संबंधित नेत्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या वृत्तानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे.   

चीनचा भारताला इशारा; हा तर अमेरिकेचा डाव

पाकिस्तानी पत्रकाराशी या मुद्यावर चर्चा करताना अली सलीम म्हणाले की, इमरान खान यांनी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत विचारणा केल्याचे अमेरिकन महिला ब्लॉगरने स्वत: सांगितले होते. ती माझ्यासोबत अनेक गोष्टी शेअर करायची. माजी गृहमंत्र्यांनी केलेल्या बलात्काराची घटनाही ती मला सांगू शकली असती. पण याबाबत ती मला काहीही बोलली नव्हती.  
माजी गृहमंत्र्यांबाबत मला कोणतही सहानुभूती नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची सुरक्षा करण्यात ते अपयशी ठरले असताना असिफ अली झरदारी यांनी त्यांच्याकडे गृहमंत्रालयाची मोठी जबाबदारी दिली. ही गोष्टीची आजही खंत वाटते, अशी भावना अली सलीम यांनी व्यक्त केली. 

राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल 

अमेरिकन महिला ब्लॉगरने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून पाकच्या माजी मंत्र्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे रहमान मलिक यांनी 2011 मध्ये त्यांच्या निवासस्थानी मद्यधुंद अवस्थेत बलात्कार केला. व्हिसासंदर्भात बैठक असावी या समजूतीने  मी त्यांच्या निवासस्थानी पोहचले होते. मात्र फुल आणि ड्रिंक देत माझे स्वागत करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर अत्याचार झाला. ते सत्तेत असल्यामुळे मौन धारण केले होते, असेही पीडित ब्लॉगरने म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Blogger said to me imran khan ask about affair claims Ali Saleem