esakal | राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Bidens, America, Donald Trump

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी नोव्हेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या आधीच विरोधीपक्षाने उभा केलेल्या उमेदवाराने कमाल केली आहे. 

राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

वॉशिंग्टन: जो बायडेन यांची डेमोक्रेटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांची थेट लढत होणार आहे. माजी उपराष्ट्रपती राहिलेले बायडेन गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे नेते राहिले आहेत. सात राज्यांच्या प्राथमिक निवडणुकीत बायडेन यांना 1995 प्रतिनिधींनी पाठींबा दिला आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरण्यासाठी 1991 प्रतिनिधींचा पाठिंबा असणे आवश्यक असते.

...म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार

अमेयावेळीची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी ठरणार आहे. कारण अमेरिकेमध्ये सध्या कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूने देशात आतापर्यंत 1 लाख 10 हजारांच्या जवळ नागरिकांचा बळी घेतला आहे. तसेच कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉइड यांच्या मृत्यूमुळे देशातील वातावरण तापलं आहे. अनेक गौरवर्णीय-कृष्णवर्णीय लोक रस्त्यावर उतरुन निदर्शनं करत आहेत. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असणार नाही. तसेच कृष्णवर्णीयांचा पाठींबा जो बायडेन यांना मिळत असल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न

अमेरिकेत आणखी आठ राज्य आणि तीन अमेरिकी प्रदेशात प्राथमिक निवडणूक होणे बाकी आहे. त्याआधीच जो बायडेन यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरण्यासाठीचा आकडा गाठला आहे. तसेच रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांना उमेदवारी निश्चित आहे. बायडेन यांनी फार पूर्वीच प्रचार सुरु केला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे त्यांना वॉशिंग्टन, डेलावेर या भागातच आपला प्रचार सिमित करावा लागला.

दाऊदसंदर्भातील या चर्चेमुळं पाकचा खोटारडेपणा पुन्हा चव्हाट्यावर!

जो बायडेन हे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती राहिले आहेत. याआधी त्यांनी 36 वर्ष सिनेटमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. 77 वर्षीय बायडेन यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रपतीपदासाठी दावा केला आहे. यावेळी त्यांना पक्षातून मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे. बायडेन यांना डेमोक्रेटिक पक्षातून बर्नी सॅंडर्स यांच्याकडून आव्हान मिळाले होते. मात्र, बायडेन यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे.

बायडेन यांना दक्षिण कॅरोलिना, वर्जेनिया, टेनेसी आणि टेक्सास येथून चांगला पाठींबा मिळाला आहे. तसेच ते आफ्रिकन-अमेरिकन नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. यावेळी डेमोक्रेटिक पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदासाठी आफ्रिकन-अमेरिकन नागरिक उमेदवार असावा अशी मागणी होत आहे. मात्र, जो बायडेन यांनी उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार एक महिला असेल असं आधीच जाहीर केलं आहे.

loading image